मंगळागौर म्हणजे? प्रश्न विचारल्यावर वंदना गुप्ते म्हणाल्या; 'लग्नानंतर हनिमून आणि मग...'

Vandana Gupte on Mangalagaur: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या तूफान गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी वंदना गुप्तेंचे एक मजेशीर वक्तव्य चर्चेत आले आहे त्यामुळे चांगलीच गंमत रंगली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 29, 2023, 03:08 PM IST
मंगळागौर म्हणजे? प्रश्न विचारल्यावर वंदना गुप्ते म्हणाल्या; 'लग्नानंतर हनिमून आणि मग...' title=
July 29, 2023 | vandana gupte gives funny answer on mangalagaur latest entertainment news in marathi

Vandana Gupte: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे त्यामुळे सध्या मराठीतला सर्वात सुपरहीट सिनेमा म्हणून या चित्रपटाची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सध्या या चित्रपटाची चांगलीच क्रेझ आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनाही फार मोठ्या प्रमाणात आवडतो आहे. मराठी प्रेक्षकवर्गासह अमराठी प्रेक्षकवर्गही या चित्रपटासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यातून बायकांसह पुरूषवर्गही यावेळी फार मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. आपल्या मित्रपरिवारासह आणि कुटुंबकबिल्यासह यावेळी प्रेक्षकवर्ग गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाच्या सेक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलाकारांनी या चित्रपटाचा सेक्सेस चांगलाच एन्जॉय केला होता. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. सध्या त्यांच्या या सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

यावेळी आपले मनोगत सर्वांनीच व्यक्त केले होते आणि सोबतच त्यांनी गप्पाही मारल्या होत्या. या जंगी सेलिब्रेशन दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला होता. यावेळी त्यांनी मुलाखतीवेळेचा वंदना गुप्ते यांचा एक भन्नाट किस्सा सांगितला होता. तेव्हा त्यांच्या या किस्स्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळालेली होती. यावेळी वंदना गुप्तेंचा हा किस्सा काय होता? जाणून घेऊया. 

हेही वाचा - 'पुरूषांचे भारीपण कोणी दाखवणार नाही' अशोक सराफ यांचा सवाल

यावेळी केदार शिंदे म्हणाले की, ''आम्ही सगळे एका मुलाखतीला गेलो होतो. त्यावेळी अनेक हिंदी आणि इंग्रजी पत्रकारांनी मंगळागौर म्हणजे काय? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा वंदना ताईंनी फारच मजेशीर उत्तर दिले होते.''

त्यावर वंदना गुप्ते म्हणाल्या की, ''मला एका पत्रकारानं मंगळागौर म्हणजे काय? असं विचारलेलं. तिला खरंच याबद्दल माहिती नव्हती. मी तिला म्हटलं की, लग्नानंतर सर्व सभारंभ, सोहळे संपतात. त्यानंतर मग हनिमूनला जातात. त्याचा सर्व ताण काढण्यासाठी जे खेळ खेळले जातात त्याला मंगळागौर असं म्हणतात. हा खेळ फारच मजेशीर असतो. सासूला शिव्या द्या, नणंदेला शिव्या द्या असं सर्व त्यात असतं'', असं त्या म्हणाल्या, सध्या त्यांचे हे वक्तव्य फारच चर्चेत आहे.

वंदना गुप्ते, रोहिणी हट्टगंणी, सुचित्रा बांदेकर, दिपा चौधरी, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने यांनी या चित्रपटात मुख्य भुमिका केल्या आहेत. त्यांच्या भुमिकांचे चांगलेच कौतुक होताना दिसत आहे.