Balika Vadhu Actor Transformation: बालिका वधूमध्ये आनंदी आणि जगियाची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. विशेषत: बालकलाकार म्हणून दिसणाऱ्या अविका गौर आणि अविनाश मुखर्जी यांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. अविका गौर अजूनही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत तेव्हा त्यातील अविनाश मुखर्जी मोठे झाल्यानंतर कसे दिसतो हे तुम्हीही एकदा पाहायलाच हवंं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालिका वधू ही छोट्या पडद्यावरील आणि कलर्स टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका बरीच वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर होती. ही मालिका बालविवाहाच्या प्रथेवर आधारित होती, ज्या मालिकेची मुख्य पात्रे खूपच प्रसिद्ध झाली. 


शोमध्ये आनंदीची बालपणीची भूमिका अविका गौरने साकारली होती तर तिच्या पतीची म्हणजेच जगिया ही भूमिका अविनाश मुखर्जीने केली होती. ज्यावेळी ही मालिका सुरू झाली होती त्यावेळी हे दोघंही खूपच लहान होते. आता ते दोघंही खुप मोठे झाले आहेत. अविका तर आता खुपच सुंदर दिसते परंतु अविनाशचे फोटो तुम्ही पाहिले आहेत का... तो आज एक हँडसम हंकपेक्षा कमी नाही. 


अविनाश मुखर्जीच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर कळते की त्याचा लुक आता किती बदलला आहे. बालिका वधू हा शो सुरू झाला तेव्हा अविनाश केवळ 11 वर्षांचा होता आणि त्याला या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली होती. आज तो 25 वर्षांचा झाला आहे. 


अविनाश मुखर्जी अजूनही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अलीकडेच ससुराल सिमर का 2 मालिकेत तो आरव ओसवालच्या भूमिकेत दिसला. त्याच्या या व्यक्तिरेखेवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.



बालिका वधू या मालिकेत बालकलाकार म्हणून दिसलेल्या अविनाश मुखर्जीला या शोमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली पण आज तो आपल्या मेहनतीने ती लोकप्रियता टिकवून आहे.