मुंबई : बालिका वधू फेम अविका गौरने आनंदी हे पात्र साकारुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर अविका घरा-घरात पोहचली. मालिकेमुळे तिला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं. सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी आनंदी या दिवसांत खूप बदलली आहे. तिच्यातला बदल पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसत आहे. अभिनेत्रीला ओळखणंही कठिण झालं आहे. या दिवसांत अभिनेत्री वेब सिरीज आणि सिनेमा करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. नुकतीच अविका एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये तिचा लूक पाहून प्रेक्षक चांगलेच हैराण होत आहे. तिच्या लूकमध्ये अनेक बदल झाल्याचे फोटोंवरून स्पष्ट होत आहे. यानंतर यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इव्हेंटमधून अविकाचा व्हिडीओ
प्रोड्यूसप आनंद पंडितने नुकतीच 11 एप्रिलाल त्याची मुलगी ऐश्वर्याची रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. या फंक्शनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अविका गौरदेखील पाहुण्यांच्या यादीत समावेश होती. तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझही दिल्या. अभिनेत्रीने हेव्ही वर्क केलेलं ब्लेजर आणि ब्लॅक ट्राऊजर घातली होती. याचबरोबर केस मोकळे सोडले होते. 



युजर्सने केलं ट्रोल
सध्या अविकाचा रेडिटव फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने म्हटलंय की, 'प्रत्येकाला आपल्या चिन संबधित का ऑब्सेशन आहे? खूपच विचीत्र वाटतंय.  तर अजून एकाने म्हटलंय, हे खूपच दुःखद आहे कारण ती फक्त 26 वर्षांची आहे. तर अजून एकाने म्हटलंय, ती खूपच मोठी वाटतेय असं वाटतंय तिचं वय 30-40 असेल. तर अनेकांनी तिने सर्जरी केली असल्याचा अंदाज लावला आहे. एकाने लिहीलंय, तिने आपल्या चिनला प्वॉइंटेड केलं. असं वाटतंय की तिने बोटॉक्स किंवा फिलर्स केलं असावं. अविका शेवटची  2023 मध्ये आलेला सिनेमा  '1920: हॉरर्स ऑफ द हार्ट' मध्ये दिसली होती. यावर्षी तिचा आगामी सिनेमा 'ब्लडी इश्क' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.