`बालिका वधू` मालिकेतील तीनही कलाकार काळाच्या पडद्याआड
ज्या कलाकारांमुळे मालिकेला यश मिळालं आज ते मात्र त्यांच्या चाहत्यांमध्ये नाहीत.
मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध मालिका 'बालिका वधू' मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. पण ज्या कलाकारांमुळे मालिकेला यश मिळालं आज ते मात्र त्यांच्या चाहत्यांमध्ये नाहीत. अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी, ज्येष्ठ अभिनेत्या सुरेखा सिकरी यांच्यानंतर आता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने या जगाचा निपोप घेतला आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला
सिद्धार्थ शुक्लाने गुरूवारी जगाचा अखेरचा निरोप घेतला. सिद्धार्थने मालिकेत आयएएस अधिकारी शिवराज शेखरच्या भूमिकेला न्याय दिसला. शिवराज शेखर एक प्रामाणिक अधिकाऱ्यासोबत कुटुंबाची काळजी घेणारा आणि पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा पती होता.
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येमुळे मनोरंजनाची दुनियाच हादरली. 'बालिका वधू' फेम प्रत्युषा तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. तिच्या संशयास्पद मृत्युने सगळ्यांनाच धक्का बसला. तिच्या मृत्यूनंतर अनेक तर्क-वितर्क लढवण्यात आले. 'बालिका वधू' मालिकेत तिने आनंदीची व्यक्तीरेखा साकारली. वयाच्या 25व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्री सुरेखा सीकरी
नॅशनल अवॉर्ड विनर अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं 16 जुलै रोजी निधन झालं. 2020मध्ये सुरेखा सिकरी यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्याचप्रमाणे 2018 मध्ये देखील त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांच्या निधनाने कलाविश्वाला मोठा धक्का बसला. सुरेखा सिकरी यांनी मालिकेत दादी या भूमिकेला न्याय दिला.