मुंबई : 'एक बार फिर से आतंक का कहेर, दिल्ली के शहेर' गेल्या अनेक दिवसांपासून 'बाटला हाऊस' चित्रपटाच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर आधारलेला 'बाटला हाउस' चित्रपटगृहात दाखल झाला. चित्रपटातील 'जाको राखे साइयां' गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतलं आहे.  वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाला अखेर हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. खुद्द अभिनेता जॉन अब्राहमने स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला. गाणं शेअर करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉन अब्राहमचा हा चित्रपटा एका सत्यघटनेवर आधारित आहे. ११ वर्षांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये एन्काऊंटरची घटना घडली होती. १९ सप्टेंबर २००८ मध्ये जामिया नगरच्या बाटला हाऊसमध्ये आतिफ अमीन आणि मोहम्मद साजित हे दोन संशयित दहशतवादी ठार झाले होते.


या चित्रपटात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जॉनसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरही दिसतेय. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'रोमियो, अकबर, वॉल्टर' या चित्रपटात जॉन अब्राहमनं एका 'रॉ' एजन्टची भूमिका निभावली होती.