नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानला बदडणाऱ्याला दोन लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आलीय. विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची 'हिंदू है आगे' या नव्या संघटनेचे आग्रा युनिटचे प्रमुख गोविंद पराशर यांनी हे बक्षीस जाहीर केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या आगामी सिनेमाचं नाव 'लवरात्रि' ठेवून सलमाननं हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप पराशर यांनी केलाय. हिंदूंचा सण असलेल्या नवरात्रिच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय जाणून-बुजून घेण्यात आल्याचंही पराशर यांनी म्हटलंय.


सिनेमाचं कथानक गुजरातच्या बॅकग्राऊंडवर आधारित आहे... हा सिनेमा येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून सलमान खान पहिल्यांदाच आपल्या मेव्हण्याला - आयुष शर्माला मोठ्या पडद्यावर लॉन्च करतोय. आयुष शर्मा हा सलमानची बहिण अर्पिता हिचा पती आहे.