मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नीना या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. याशिवाय नीना या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्याचबरोबर  नीना गुप्ता गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत अनेक विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. पण म्हणावी तशी प्रसिद्धी त्यांना मिळाली नाही, 'बधाई हो' सारख्या चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाला एक वेगळं वळण देऊन नीना गुप्ताने स्वतःच नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अभिनेत्री नीना गुप्ता त्यांची मुलगी मसाबामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सांगितलं आहे की, तिने आयुष्यात घेतलेल्या निर्णयांचे कोणतंही नियोजन केलं नाही, तर ते निर्णय तिच्यासाठी देवाचा मास्टर प्लॅन होता. नीना गुप्ता लग्नाआधीच आई बनल्या. त्यांनी मुलगी मसाबाला जन्म दिला आणि तिची एकटीनेच काळजी घेतली.


अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. मसाबाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की 80 आणि 90 च्या दशकात भारतीय समाजात मूल होणं आणि तिला एकटं वाढवणं खूप कठीण होतं. नीनाचे वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू विवियन रिचर्ड्स यांच्याशी असलेल्या नातेसंबंधामुळे मुलगी मसाबाचा जन्म झाला. क्रिकेटपटूने दुसऱ्याशी लग्न केलं होतं. नीना आणि विवियन आयुष्यभर वेगळं राहिलं. इंडस्ट्रीतील पहिली सिंगल मॉम असल्याने ती खूप बोल्ड आणि मजबूत मानलं जातं.


'आयुष्य इतकं आव्हानात्मक असेल हे मला माहीत नव्हतं'
इतकंच नाही तर नीना पुढे म्हणाल्या की, 'मी असा कोणताही प्लान बनवला नाही की, ज्याच्यासोबत मी जगू शकत नाही अशा व्यक्तीच्या प्रेमात पडेन आणि त्याच्यासोबत एक मूलही होईल. माझं जीवन इतकं आव्हानात्मक असेल आणि मला धैर्याने सामोरं जावं लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.


तिच्या आयुष्यातील अनुभवाविषयी बोलताना बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता पुढे म्हणाल्या की, मी कधीही हार मानली नाही आणि माझ्या निर्णयावर ठाम राहिले. यासाठी मी कधीही आर्थिक किंवा भावनिक मदत घेतली नाही.  


याशिवाय मी काय करू शकते, एकतर मी रडत राहीन किंवा कोणाशी तरी लग्न करेन. मी रडत राहिले तर माझं आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. मी हिम्मत दाखवण्याची योजना आखली नव्हती, परंतु मी फक्त गोष्टी स्वीकारल्या. देवाने जे दिलं ते घेऊन मी पुढे गेले.