Karishma Kapoor and Akshaye Khanna : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे लाखो चाहते आहेत. करिश्मा आज अभिनय क्षेत्रात दिसत नसली तरी देखील तिच्या चाहत्यांची संख्या कमी होत नाही. करिश्मा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. करिश्माचं वैवाहिक आयुष्य काही चांगलं नव्हतं. तिचा काही काळातच घटस्फोट झाला. पण तुम्हाला माहितीये का कधी काळी करिश्मा ही बच्चन कुटुंबाची सून होणार होती. पण अचानक असं काही झालं की त्यांचा साखरपुडा मोडला. त्याविषयी अनेकांना माहित आहे. पण अभिषेक आधी करिश्मा ही अक्षय खन्नासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता. पण प्रत्यक्षात असं घडलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

90 च्या दशकात करिश्मा आणि अजय देवगण हे रिलेशनशिपमध्ये होते. अजयसोबत रिलेशनशिपमध्ये असताना करिश्मा आणि अक्षय खन्नामध्ये जवळीकता वाढू लागली. त्यामुळे तिचा आणि अजयचा ब्रेकअप झालं. खरंतर असं म्हटलं जातं की अजयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिश्मा एकटी पडली होती. त्यावेळी अक्षयनं तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. त्याचं झालं असं की दोघं एका फोटोशूटसाठी एकत्र आले होते. ते पाहता त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, करिश्माचे वडील रणधीर कपूर यांना अक्षय आवडला होता. त्यामुळे त्यांनी विनोद खन्ना यांच्याकडे लेकीच्या लग्नाचा प्रस्तावही पाठवला होता. पण एका व्यक्तीमुळे हे लग्न होऊ शकलं नाही. ती म्हणजे करिश्माची आई बबीता. बबीता यांनी करिश्मा आणि अक्षयच्या लग्नाचा विरोध केला. करिश्मा ही यशाच्या शिखरावर होती. त्यामुळे तिनं याकाळात लग्न करू नये अशी बबीता यांची इच्छा होती. आईच्या इच्छे विरूद्ध न जाता करिश्मानं लग्न केलं नाही. त्यानंतर अक्षय आणि करिश्माच्या लग्नाचा टॉपिक तिथेच थांबला. 


करिश्मा आणि अभिषेकचा साखरपुडा का मोडला? 


करिश्मा आणि अभिषेकचा साखरपुडा मोडण्यासाठी देखील तिची आई बबीता जबाबदार होती. खरंतर बच्चन कुटुंबाची इच्छा होती की लग्नानंतर काम करू नये. मात्र, करिश्मा तिच्या करिअरच्या शिखरावर असताना तिनं काम सोडू नये अशी बबीता यांची इच्छा होती. त्यामुळे अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा मोडला. 


हेही वाचा : 'मला मराठी येतं, प्लीज काम द्या', शाहरुखसह 'जवान'मध्ये स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीची विनंती


दरम्यान, अभिषेकसोबत साखरपुडा मोडल्यानंतर करिश्मानं संजय कपूरशी लग्न केलं तर अभिनेत्यानं ऐश्वर्या रायशी. पण तुम्हाला माहितीये का अक्षय खन्नानं अजूनही लग्न केलेलं नाही. त्यामुळे अक्षयला अनेक मुलाखतींमध्ये लग्न का केलं नाही असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अक्षयनं हेच उत्तर दिलं होतं की लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांसाठी तो तयार नाही. त्यासोबत कमिटमेंट देण्यासाठी देखील तो तयार नाही. लग्नानंतर संपूर्ण आयुष्य बदलतं.