Actress wants to work in marathi movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. शाहरुखचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत अनेक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यापैकी एक म्हणजे मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक. गिरिजा ओकला या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. गिरिजा देखील या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. अशात आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गिरिखानं मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
गिरिजानं ही मुलाखत सकाळला दिली आहे. यावेळी चित्रपटाविषयी बोलत असताना गिरिजाला विचारण्यात आलं की तू ओटीटी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असते. मराठी चित्रपटांमध्ये तू फार कमी दिसतेस. पैठणीची गोष्या या चित्रपटात तू दिसली होती, पण तू भूमिका कशा पद्धतीनं निवडतेस? या प्रश्नावर उत्तर देत गिरिजा म्हणाली की 'खरं सांगायचं झालं तर कोणत्याही गोष्टीचा आधीच विचार करून किंवा कसं काय हवं याचा ग्राफ ठरवून काहीही होत नसतं. जे काम मला करायची इच्छा होते ते मी करते. त्यातही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला मराठीत चित्रपट करण्यासाठी जास्त ऑफर येत नाही. उदा. खूप चित्रपटांच्या ऑफर येतात आणि मी त्यांना नाही म्हटलं असं होत नाही. त्यामुळे माझी ही मुलाखत जर मराठी निर्माते बघत असतील तर मी विनंती करते की मला मराठी चित्रपटात घ्या. मी उत्तम मराठी बोलते आणि त्यातही मी मराठी आहे.'
हेही वाचा : वयाच्या 23 व्या वर्षी 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनं कृष्णभक्तीसाठी अभिनयाला ठोकला रामराम
पुढे मराठी काम करायची इच्छा असताना त्यातून काही होत नाही असं होतं का? यावर उत्तर देत गिरिजा म्हणाली की 'खरंतर मी वाटत बघत बसली आहे, कोणी विचारत नाहीये अस देखील नाही. मी काम करते. माझं सध्या खूप काही सुरु आहे. मला अनेक लोक विचारतात तुम्ही मराठीत काम का करत नाही? पण मी असं काही ठरवलं नाही, की आपण मराठी चित्रपट करायचे नाही. माझ्याकडे काही येत नाही, कदाचित माझ्यासाठी योग्य असं काही मला अजून सापडलेलं नाही. मराठीत काम करणारी सगळीच माणसं माझ्या ओळखीची आहेत. सगळेच मित्र-मैत्रिणी आहेत. त्यामुळे असं काही नसेल. कदाचित माझ्यासाठी अजून हवी तशी भूमिका नसेल. त्यामुळे मराठीत विचारणा झाली नसेल. जेव्हा मिळेल तेव्हा खूपच आवडेल. माझी ही भाषा आहे, त्याच्यावर माझी पकड आहे. आपण ज्या भाषेत विचार करतो, त्या भाषेत अभिनय करणं, खूप वेगळं आणि घरी असल्यासारखं वाटत. त्यामुळे मराठी नाटक, चित्रपट करायला खूप आवडेल. अर्थात मी सगळ्या गोष्टीची वाटत बघतेय. त्यात मी मराठी चित्रपटाचीही वाट बघतेय.'