मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स एखाद्या प्रकरणावर ट्विट किंवा पोस्टद्वारे आपलं मत मांडताना दिसतात. सध्या शाहरुख खानचा मुलगा आर्य़न खान ड्रग्स प्रकरणात अडकला आहे. त्याची NCB कडून चौकशी सुरु आहे. यावेळी शाहरुखसोबत त्याचे फॅन्स उभे आहेत. एवढंच नाही, तर अनेक मोठ्या स्टार्सने शाहरुखला सपोर्ट दाखवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण बऱ्याचदा आपलं मत ठाम पणे मांडणारा आमीर खान या प्रकरणात काहीही बोलताना दिसला नाही. त्याने कोणत्याही प्रकारची पोस्ट किंवा प्रतिक्रिया अद्याप शेअर केलेली नाही. याउलट अभिनेता सलमान खान आर्य़न खानच्या अटकेनंतर रात्री उशिरा शाहरुख खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला होता.  आमिर खानचे मौन अनेकांना आश्चर्यचकीत करणारे ठरत आहे. कारण लोक त्याला एक स्पष्टवक्ता अभिनेता म्हणून ओळखतात.


केआरकेने आपल्या एका ट्विटद्वारे सांगितले आहे की, आमीर खानने आर्यन खान प्रकरणावर आतापर्यंत मौन का ठेवले आहे? केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'जेव्हा एका मित्राने आमिरला विचारले की त्याने आर्यन खान प्रकरणावर आतापर्यंत मौन का ठेवले आहे, तेव्हा तो म्हणाला की ना मी शाहरुख खानचा मित्र आहे ना मी त्याचा शत्रू आहे. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. सही बात है… हे बॉलिवूड कुटुंब आहे, हे या कुटुंबाचे वास्तव आहे.


केआरके आपल्या ट्विटद्वारे सांगण्याचा सतत प्रयत्न करत आहे की, लोक बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला एक कुटुंब मानतात पण प्रत्यक्षात हा एक कुटुंब नसून एक चित्रपट व्यवसाय आहे. येथे लोक स्वतःच्या फायद्यासाठी मित्र बनतात आणि काम संपल्यानंतर ते एकमेकांचे तोंडही बघत नाहीत. असा दावा सध्या केआरके करताना दिसतोय.