Success Story: शून्यापासून सुरूवात करत पुराणकथेच्या बळावर मालिकेनं जमवला कोट्यवधी रूपयांचा गल्ला
परंतु या सगळ्या मालिकांच्या आधी अशीच एक मालिका होती जिनं इतिहास रचला होता.
Ramayan Television Serial: गेल्या वीस एक वर्षात मराठी तसेच हिंदी मालिकांचा दर्जा वाढला आहे. प्रेक्षक हिंदीसोबतच प्रादेशिक मालिकांना जोरदार पसंती देत आहेत. एकता कपूरच्या हिंदी मालिकांनी एकेकाळी भरमसाठ प्रेक्षकवर्ग तयार केला होता. त्याचबरोबर मराठी मालिकांचाही तोडीस तोड प्रेक्षक तयार झाला आहे. मराठीतील 'श्रीयुत गंगाधर टीपरे'पासून, 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ते आत्ताची 'आई कुठे काय करते?' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकांनी प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवलेली होती. आजही अनेक मराठी प्रेक्षक नव्या - जुन्या मालिका न विसरता पाहतात आणि आवडीनं आपल्या प्रतिक्रियाही सांगतात. (before anupama and ekta kapoor serials this serial toped the trp ratings know more)
आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का
परंतु या सगळ्या मालिकांच्या आधी अशीच एक मालिका होती जिनं इतिहास रचला होता. ती मालिका संध्याकाळी सुरू झाली की रस्ते अक्षरक्ष: ओस पडायचे. आपापल्या घरी लोकं टीव्हीसमोर बसून ही मालिका आवडीनं पाहायचे. या मालिकेनं देशातच काय संपुर्ण जगात न भुतो न भविष्यती असा पराक्रम केला होता. तुम्ही या वर्णनावरून ही मालिका कोणती हे ओळखलं असेलच. आम्ही रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेबद्दल बोलत आहोत. या मालिकेनं त्या काळी अल्पावधीच लोकप्रियता मिळवली होती.
आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...
पण तुम्हाला माहिती का की या मालिकेनं अल्पावधीच कोट्यवधी रूपयांची कमाई केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, या मालिकेचा एक एपिसोड बनवण्यासाठी 30-40 लाखांपर्यंत अंदाजे खर्च येयचा. आजकाल एक सिरियल तयार करण्यासाठी करोडोंपेक्षाही जास्त पैसे खर्च होतात त्यातून आज कुठली पौराणिक मालिका असेल तर त्यासाठी त्याहूनही जास्त रूपये खर्च केले जातात. परंतु 'रामायण' ही अशी मालिका होती जी बनवण्यासाठी फारच कमी खर्च लागायचा. ही मालिका 1987 साली प्रसारित झाली होती. या मालिकेचे फक्त 78 एपिसोड पुर्ण झाले होते. या कमी एपिसोडमध्ये या मालिकेनं 30 करोडच्या वर कमाई केली होती.
या मालिकेचं प्रसारण 55 देशांमध्येही करण्यात आलं होतं आणि एक एपिसोड साधारण 35 मिनिटांचा असायचा. या मालिकेची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. अरूण गोविल, (Arun Govil) दीपिका चिखलिया आणि अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेले राम, लक्ष्मण आणि सीता आजही लोकांच्या मनात स्थान निर्माण ठेवून आहेत.