मुंबई : सामंथा आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या चार वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोटाची घोषणा केली. पण, 2018 मध्ये, जेव्हा त्यांचे लग्न होऊन अवघे सहा महिने उलटले होते, त्याचवेळी सामंथाने मूल होण्यासाठीची योग्य वेळ निश्चित करण्याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाखतीत सामंथा म्हणाली होती की, तिचे मूल हेच तिच्यासाठी सर्वस्व असेल कारण तिचे बालपण मजेशीर नव्हते. पण दुर्दैवाने, सामंथा आणि नागा चैतन्य त्यांच्यातील मतभेदांमुळे वेगळे झाले.



सामंथा आणि नागा चैतन्यचं बेबी प्लॅनिंग?


2 ऑक्टोबर रोजी सामंथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली. 2017 मध्ये गोव्यात लग्न करण्यापूर्वी या जोडप्याने तीन वर्षे डेट केले. 2021 मध्ये त्यांच्यालग्नाच्या वाढदिवशी त्यांनी विभक्त होण्याची घोषणा केली. पण, 2018 मध्ये, सामंथा म्हणाली होती, "मला माझे बाळ कधी हवे आहे यासाठी मी एक तारीख ठरवली आहे.


तारीख निश्चित झाली आहे ! जसे की, आम्ही ठरवलेल्या तारखेनुसार हे घडणार आहे! पण नागा चैतन्यने नेमून दिलेल्या तारखेला होईल याची खात्री वाटते ! पण आम्हाला मूल कधी हवं आहे याची योग्य वेळ आम्ही निश्चित केली आहे."