मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे फंक्शन्स सुरू झाले असून दोघंही उद्या सात फेरे घेणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दोघंही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक वर्ष डेट केल्यानंतर आलिया-रणबीर आता लग्नबंधनात अडकणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियाला तिचा मिस्टर परफेक्ट लगेच मिळाला नाही. रणबीर कपूरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आलियाने अनेकांना डेट केलं आहे. रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी तिचं अनेकवेळा हार्टब्रेक झालं आहे. आलियाने रणबीरच्या आधी कोणाला डेट केलं आहे ते आज आम्ही तुम्हाला आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून सांगणार आहोत.  


रमेश दुबे
रमेश दुबे हा आलियाचा पहिला बॉयफ्रेंड होता. शालेय जीवनातच दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. दोघं जमनाबाई नरसी शाळेत एकत्र शिकत होते. अहवालांवर विश्वास ठेवला तर  रमेश खूप प्राइवेट व्यक्ती आहे. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही.


अली दादरकर
बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी आलिया अली दादरकरला डेट करत होती. दोघं बालपणीचे मित्र होते आणि काही काळ एकत्र राहिले. दोघेही अनेकदा डिनर डेटवर आणि कॅज्युअल आउटिंगला दिसले होते. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर,  आलियाने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवताच तिच्या वागणुकीत बदल झाल्याचं अलीने सांगितलं.


सिद्धार्थ मल्होत्रा
स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून आलियाने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटानंतर आलिया आणि सिद्धार्थ रिलेशनशिपमध्ये आले. स्टुडंट ऑफ द इयरनंतर दोघांनी कपूर अँड सन्समध्ये एकत्र काम केलं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही आणि दोघंही वेगळे झाले.


कवीन मित्तल
सिद्धार्थ मल्होत्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर आलिया आणि रणबीरच्या डेटिंगच्या बातम्या समोर येऊ लागल्या. त्याचवेळी आलिया कवीनसोबतच्या जवळीकतेमुळे चर्चेत आली होती. रिपोर्ट्सनुसार, दोघंही काही काळ एकमेकांना डेट करत होते. काविन हा हाईक पॅसेंजरचा संस्थापक आहे.