Emergency च्या प्रदर्शनाआधी पाकिस्तानमध्ये कंगना रणौतचीच चर्चा? एकदा तुम्हीही `हा` VIDEO पाहाच
Kangana Ranaut Mimicry Video : कंगना रणौतची चर्चा फक्त भारतात नाही तर पाकिस्तानमध्येही... या VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा
Kangana Ranaut Mimicry Video : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा 'इमर्जन्सी' या आगामी चित्रपटामुळे सध्या ती फक्त भारतात नाही तर पाकिस्तानमध्ये देखील चर्चेत आहे. तिथले कलाकार कंगनाची मिमिक्री करत आहेत.
खरंतर, रमीज राजाच्या शोमध्ये पोहोचलेल्या पाकिस्तानी महिलेचा हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओवर ती कंगनाची मिमिक्री करताना दिसत आहे. या कारणामुळे कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता पाकिस्तानचे कलाकार कंगनाची नक्कल करत आहेत. रमीज राजा यांच्या शोमध्ये पोहोचलेल्या एका पाकिस्तानी महिलेनं कंगनाची मिमिक्री केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये हा पाकिस्तानचा शो असल्याचे कळत आहे. या शोचं नाव शो टाइम विथ रमीज राजा असं आहे. यात एक पाकिस्तानी महिला भारतीय अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतची मिमिक्री करताना दिसते. ही महिला एगदी छोट्या छोट्या गोष्टी कॉपी करताना दिसते. इतकंच नाही तर कंगनाच्या क्वीनचा एक सीन देखील त्यांनी या शोमध्ये रिक्रिएट केला आहे. कंगना नक्कल करताना बोलते की आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात दोन प्रकारचे पुरुष पाहिले आहेत. एक विवाहीत आणि दुसरे डिटर्जेंट आणि दोघंही कपडे धुण्याचं काम अगदी चोख करतात. हे ऐकूण सगळेच प्रेक्षक हसू लागतात. त्यानंतर शोमध्ये सगळेच त्यांची स्तुती करतात इतकंच नाही तर टाळ्या देखील वाजवतात. या दरम्यान, रमीज राजा आणि इकरा अजीजचा नवरा यासिर देखील तिथे उपस्थित होते.
या व्हिडीओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या व्हिडीओवर लोकं वेगवेगळ्या कमेंट देखील करत आहेत. आता एका नेटकऱ्यानं लिहिलं की 'जागतिक स्तरावर अपमान होत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'काहीही म्हणा पण, मिमिक्री चांगली केली आहे.'
हेही वाचा : लेकीचं नव्या घरात स्वागत केल्यानंतर दीपिकानं घेतली आणखी एक पॉपर्टी, किंमत कोटींच्या घरात
दरम्यान, कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट अजूनही सेंसॉरशिपमध्ये अडकलाय. तिच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख सतत पुढे ढकलण्यात येत आहे.