मुंबई : साउथ सिनेमातील अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या 'लाइगर' या चित्रपटासाठी जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, या चित्रपटाने रिलीजपूर्वीच करोडोंची कमाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहवालांवर विश्वास ठेवायचा झाला तर, चित्रपटाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातून सुमारे 62 कोटी रुपये कमावले आहेत तर कर्नाटकातून 5.20 कोटी रुपये. तामिळनाडूमधून 2.5, केरळमधून 1.20, हिंदी राज्यांमधून 10 कोटी आणि इतर राज्यांमधून 7.50 कोटी रुपये. त्यानुसार चित्रपटाने आतापर्यंत 88 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.


अलीकडेच या चित्रपटावर बहिष्कार टाकल्याची बातमी आली होती. त्यानंतर विजय देवरकोंडाने आपलं स्पष्टीकरण दिलं. अभिनेता म्हणाला की, मी आजारी आहे. पण तरीही तुमच्या प्रेमामुळे मला इथे यायचं होतं. 'लायगर'च्या जाहिराती माझ्या आयुष्यभराच्या आठवणी आहेत. तुमच्यासाठी अशा अनेक आठवणी निर्माण करण्यासाठी लाइगर हे माझं पहिलं पाऊल असेल. 'मी तुम्हाला हमी देतो, चित्रपट धमाल करेल. 25 ऑगस्टला धुमाकूळ घालेल. 


पुरी जगन्नाध दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे जो २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चार गाणी आणि ट्रेलरही आले आहेत ज्यांनी पडद्यावर धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने रिलीजपूर्वी इतकी कमाई केली असताना आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किती कोटींचा गल्ला जमवतो हे पाहावं लागेल.