OTT Webseries to Watch This Weekend: सध्या ओटीटीचा जमाना आहे त्यामुळे प्रेक्षक हे ओटीटीवर कुठली नवीन वेबसिरिज येते आहे, किंवा पिक्चर येतो आहे याची आवर्जून वाट पाहताना दिसतात. सध्या उन्हाळ्याची सुट्टी संपली आहे आणि सोबतच विकेंडला एकतरी वेबसिरिज पाहिलीच असेल. आता जूनच्या महिन्यातही तुम्हाला वेबसिरिजची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.त्यामुळे हा महिनाही तुमच्यासाठी अत्यंत हटके आणि थ्रिलर वेबसिरिजची रांग लागली आहे. सध्या मस्त पावसाळ्यालाही सुरू झाली आहे. तेव्हा तुम्हाला विकेंडला जाण्यासाठी कुठेतरी ट्रेकिंग किंवा आऊटींगला जाण्यासाठी आपण प्लॅन्स करताना दिसतो. परंतु नाईट आऊट किंवा मस्त मी टाईम एन्जॉय करण्यासाठी किंवा फॅमिली टाईम एन्जॉय करण्यासाठीही आपण स्टेकेशनसारखे पर्याय निवडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा अशावेळी कुठे गेला असाल किंवा घरी बसून बोअर होत असाल तर तुम्ही या काही हटके वेबसिरिजचा आस्वाद घेऊ शकता. तुमच्या आवडत्या कलाकारांच्या या वेबसिरिज तुमच्या भेटीला आल्या आहेत. तेव्हा तुम्हीही घरबसल्या या वेबसिरिज एन्जॉय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की, यावर्षी पावसाळ्याच्या सुट्टीत तुम्ही कोणत्या हटके वेबसिरिज पाहू शकता. सध्या हिंदीत या वेबसिरिजची रांग लागली आहे. या सर्व सिरिज तुम्ही मोफत जिओ सिनेमावर पाहू शकता. 


1. असूर 2 - सध्या या वेबसिरिजची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. अर्शद वारसीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे. त्यामुळे ही वेबसिरिज सगळ्यांसाठी पर्वणी ठरली आहे. ही वेबसिरिज या विकेंडला तुमच्या टॉप प्रायोरिटीमध्ये नक्कीच ठेवा. 


2. ब्लडी डॅडी - शाहिद कपूरच्या अभिनयानं संपन्न ही वेबसिरिज तुम्ही न चुकता पाहा कारण या वेबसिरिजमधून तुम्हाला भरपूर एक्शन आणि फायटिंग सीन्ससोबत सेस्पेन्स पाहायला मिळणार आहे. 


3. इन्सपेक्टर अविनाश - रणदीप हुडा तुमचा आवडता कलाकार आहे ना मग वेळ कसली पाहताय, आज त्याचा इन्सपेक्टर अविनाश ही वेबसिरिज अजिबातच मिस करू नका. 


4. क्रॅकडाऊन - क्रॅकडाऊन ही आगळ्यावेगळ्या विषयाची वेबसिरिज तुम्ही आवर्जून पाहू शकता. यातूनही तुम्हला थ्रिलर आणि सेस्पेन्सचा धमाका पाहायला मिळणार आहे. 


हेही वाचा - Miss World जिंकल्यानंतर ऐश्वर्यानं दाखवला होता साधेपणा; 29 वर्षांनंतरही 'त्या' फोटोची आजही चर्चा


5. तंदूर - तरूणांचा विषय हाताळणारी तंदूर ही वेबसिरिज तुम्ही नक्की पाहू शकता. रश्मी देसाई आणि तनुज विरमानी यांची या सिरिजमध्ये प्रमुख भुमिका आहे. 


6. लंडन फाईल्स - संपुर्ण सस्पेन्स ड्रामा आणि एक्शन पाहायचं असेल तर अर्जुन रामपालची लंडन फाईल्स ही सिरिज मिस करू नका. 


7. अपहरण - अपहरण ही आगळी वेगळी आणि वेगळ्या विषयाची वेबसिरिजीह तुम्ही या विकेंडला एन्जॉय करू शकता.