मुंबई : टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता पीयूष सहदेव (वय-35) याला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका 23 वर्षीय फॅशन डिझायनरवर बलात्कार केल्याच्या आरोप प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी पीयूष सहदेवला अटक केली. पीडित फॅशन डिझायनर आणि पीयूष गेले दोन महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते, अशी माहिती आहे.


काय आहे प्रकरण?


वय वर्षे 35 असलेला पीयूष सहदेव याच्यावर आरोप आहे की, त्याने पीडितेचा पहिल्यांदा विश्वास संपादन केला. त्यानंर तिला मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करेन असा विश्वास दिला. त्यानंतर त्यांच्यात बरीच जवळीक वाढली. वाढत्या जवळीकिचा फायदा उठवत सहदेवने तिच्यावर बलात्कार केला, असा त्याच्यावर आरोप आहे.


पोलिसांचे म्हणने काय?


दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यावर सहदेवला अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आले. पीडितेने पीयूष विरोधात 20 नोव्हेंबरला पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी पीयूषला बुधवारी अटक केली. दरम्यान, वर्सोवा पोलीस सीनिअर इन्स्पेक्टर किरण काळे यांनी सांगितले की, 27 नोव्हेंबरपर्यंत पीयूषला पोलीस कोठडीत ठेवण्यात येईल. त्याच्या विरोधात भा.द.सं. 376 (1)(बलात्कार) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


कोण आहे पीयूष सहदेव?


पीयूष सहदेव टीव्ही मालिकांमध्ये काम करतो. त्याने 'देवों के देव...महादेव', 'सपने सुहाने लड़कपन के' आणि 'बेहद' यांसारख्या मालिका आणि काही शोमध्येही काम केले आहे. 'देवों के देव...महादेव' या मालिकेत त्याने प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारली होती. त्याने 'मीत मिला दे रब्बा'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याशिवाय 'घर एक सपना', 'गीत', 'मन की आवाज प्रतिज्ञा' आणि 'हम ने ली है शपथ' यांसारख्या कार्यक्रमातही आपला सहभाग दिला होता.