मुंबई : 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतील मलखान म्हणजेच दिपेश भानचं शनिवारी सकाळी निधन झाले. दीपेशच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांसह संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या पश्चात पत्नी आणि एक वर्षाचा आहे. शनिवारीच दिपेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. त्याचवेळी दिपेशची पत्नी एका वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन असहाय्य दिसत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाला कडेवर घेऊन दीपेश भानच्या पत्नीची अवस्था पाहून सगळेच भावूक झाले. अनेक जण यावेळी अभिनेत्याच्या पत्नीचे सांत्वन करताना दिसले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, शुक्रवारी क्रिकेट खेळत असताना तो अचानक खाली पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 


अभिनयाचा शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2005 मध्ये दीपेश मुंबईत आला. दीपेशचं 2019 मध्ये दिल्लीत लग्न झालं होतं. जानेवारी 2021 मध्ये दिपेशच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. 


या शोपूर्वी, दीपेशनं 'कॉमेडी का किंग कौन', 'कॉमेडी क्लब', 'भूतवाला', 'एफआयआर' सोबत 'चॅम्प' आणि 'सुन यार चिल मार' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 2007 मध्ये दिपेशनं 'फालतू उटपटांग चटपटी कहानी' या चित्रपटातही काम केलं होतं. यासोबतच तो आमिर खानसोबत टी-20 वर्ल्ड कपच्या जाहिरातीतही दिसला होता.