मुंबई : एका प्रसिद्ध अभिनेत्रीची तबीयत अचानक बिघडल्याची घटना घडली आहे. तिला सध्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'भाग्य लक्ष्मी'मध्ये (Bhagya Lakshmi) दिसणारी अभिनेत्री मीरा मिश्राची (Maera Mishra) प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी समोर येताच टीव्ही इंडस्ट्रीतील सहकलाकारांसह चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 


दिवाळीच्या दोन दिवस आधीपासून मीरा मिश्राला (Maera Mishra) ताप आला होता आणि या अवस्थेतही ती शूटिंग करत होती. त्याचवेळी मीराला हा फक्त व्हायरल फिव्हर असल्याचे वाटले होते. त्यामुळे ती दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत बरेलीला पोहोचली होती. या दरम्यान तिने तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले आणि ती आजारी पडली होती. त्यानंतर कुटूंबियांनी तिला डॉक्टरकडे नेले होते. यावेळी डॉक्टरांनी तिला रुग्णालयात अॅडमीट होण्याचा सल्ला दिला होता. सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून  तिच्यावर उपचार सुरु आहेत. 



दरम्यान मायरा मिश्रा (Maera Mishra) 'भाग्य लक्ष्मी' (Bhagya Lakshmi) या टीव्ही शोमध्ये मलिष्का बेदीची भूमिका साकारत आहे. तिची भूमिका प्रेक्षकांना खुप आवडली होती. त्यामुळे आता मीराचे चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.