मुंबई : सलमान खानचा सुपरहिट चित्रपट मैने प्यार कियामधील निरागस चेहऱ्याची सुमन सगळ्यांनाच माहित आहे.  भाग्यश्रीने हा रोल केला होता. नुकतीच भाग्यश्री लाईफ ओकेवरील लौट आओ तृषा या मालिकेत दिसली होती. त्यानंतर भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आलीये. सध्या ती तिच्या मैत्रिणीसोबत ग्रीसमध्ये फिरतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाग्यश्री ४९ वर्षांची झालीये मात्र तिला पाहिल्यानंतर जणू काही ती कॉलेज गर्ल आहे की काय असे वाटते. भारतात उन्हाळा सुरु झालाय. सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी लोक विदेशात फिरायला जातायत. भाग्यश्रीही ग्रीसमध्ये फिरतेय. भाग्यश्रीसोबत ९० च्या दशकातील अभिनेत्री शीबाही आहे. भाग्यश्री आणि शीबासह त्यांच्या मैत्रिणीही आहेत. 


भाग्यश्रीने तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. ४९ वर्षांची भाग्यश्री कॉलेज स्टुडंटप्रमाणे दिसतेय. ग्रीसमध्ये ती शॉर्ट स्कर्टमध्ये दिसली होती.