मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या सीझन सुरू आहे तो बायोपिक्सचा... सिनेनिर्मात्यांना सध्या पीरियड ड्रामा सिनेमे जास्तीत आकर्षून घेत आहेत. या दरम्यान बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रानौतही झीशीची राणी लक्ष्मीबाई यांची कहाणी घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' सिनेमाचं दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. त्यासोबतच सिनेमाचं ज्युकबॉक्सही प्रेक्षकांसमोर आणलं गेलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात कंगना रानौतसोबत 'झलकारी बाई'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनंही आपल्या ट्विटर अकाऊंटवर लॉन्च इव्हेंटचा फोटो शेअर केलाय. तर 'झी म्युझिक'नं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमाचा ज्युकबॉक्स प्रदर्शित केलाय. सिनेमात एकूण आठ गाणी असतील.. परंतु, व्हिडिओत सध्या केवळ दोन गाणी शेअर करण्यात आलीत.


ऐतिहासिक पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला बिग बजेट सिनेमा 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हिंदी आणि तेलगु भाषेत २५ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात येईल. सिनेमात कंगनाशिवाय अतुल कुलकर्णी, जिशु सेनगुप्ता, सुरेश ओबेरॉय, डॅनी आणि अंकिता लोखंडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.