मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग नुकताच आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मानंतर भारती आणि पती हर्ष लिंबाचिया प्रचंड आनंदी  आहेत. दोघांच्या कुटुंबात देखील उत्साहाचं वातावरण आहे. मुलाच्या जन्मानंतर फक्त सेलिब्रिटींनीचं नाही, तर चाहत्यांनी देखील भरती आणि हर्षला शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाला भारतीच्या मुलाची पहिली झलक पाहायची आहे. पण भरतीने अद्याप मुलाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीने मुलाचा फोटो शेअर केला नसला तरी, तिने मुलाचं नाव मात्र चाहत्यांनी सांगितलं आहे. भारतीच्या मुलाचं नाव ऐकून तुम्हाला देखील हासू आवरणार नाही. भारतीने मुलाचं नाव चाहत्यांनी सांगितलं आहे. 



भारतीच्या मुलाचं नाव ऐकून हसायला येत असलं तरी, अर्थ मात्र भावुक करणारा आहे. भारती आणि हर्ष त्यांच्या गोंडस बाळाला गोला म्हणून हाक मारतात. पण गोला नावाचं अर्थ  तुम्हाला माहिती आहे का, भारतीने मुलाचं गोला का ठेवलं? असे प्रश्न तुमच्या देखील मनात आले असतील.


भारतीने मुलाचं गोला का ठेवलं... 
खुद्द भारतीने यागोष्टीचा खुलासा केला आहे. भारतीचा मुलगा मस्त गोलमटोर आहे. भारतीच्या गोंडस मुलाला पाहाताचं प्रत्येक जण प्रेमात पडेल. जेव्हा भारतीने पहिल्यांदा मुलाला पाहिलं तेव्हा तिच्या मनात गोला नाव आलं. 


तेव्हापासून भारती आणि हर्ष मुलाला गोला म्हणून हाक मारतात. गोला नावाचा अर्थ नदी असाही होतो. हे एक हिंदू नाव आहे.