गुडन्यूज, गुडन्यूज, गुडन्यूज.... भारती सिंगकडून चाहत्यांना पुन्हा एकदा गुडन्यूज
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया गेल्या महिन्यातच पालक झाले आहेत.
मुंबई : भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया गेल्या महिन्यातच पालक झाले आहेत. भारती आणि हर्षला एक मुलगा आहे. ज्याच्यासोबत दोघंही खूप आनंदी आहेत. दरम्यान, आता भारतीने पुन्हा एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना नवीन आनंदाची बातमी दिली आहे. भारतीने तिच्या यूट्यूब चॅनलवर प्रत्यक्षात एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणते की तिला तुमच्यासोबत एक गुडन्यूज शेअर करायची आहे. मी काय करू, मला लाज वाटते, पण आता ते झालं, काय झालं. काहीच नियोजन नव्हतं. मग हर्ष लिंबाचिया सुद्धा येतो आणि म्हणतो का लाजतेय, आता जे झालं ते झालं.
भारती आधी तिच्या पूर्ण दिवसाचं वेळापत्रक देते. याशिवाय, ती असंही सांगते की आज हर्षची सुट्टी आहे. त्यामुळे तो मुलासोबत घरीच राहून त्याच्यासोबत वेळ घालवेल. भारती म्हणते की, आता हर्षला समजेल की मुलाला घरात एकटे कसं सांभाळायचं असतं.
मग भारती सर्वांना आनंदाची बातमी देते आणि सांगते की, तिला YouTube वरून सिल्व्हर आणि गोल्डन बटण मिळालं आहे. खरंतर, भारतीचं स्वतःचं lol नावाचं यूट्यूब चॅनल आहे. ज्याचा अर्थ लिंबाचिया ऑफ लाइफ आहे. या चॅनलद्वारे भारती तिच्या आयुष्याविषयीचे सगळे अपडेट्स देत असते. चाहत्यांनाही दोघांचे व्हिडिओ खूप आवडतात. प्रेग्नेंसीची बातमीही भारतीने यूट्यूब चॅनलवरून दिली होती.