Bharti Singh Pregnant : टेलिव्हिजनची कॉमेडी क्वीन भारती सिंग तिच्या कॉमेडी टायमिंगसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रीय असणारी, भारती बऱ्याच वेळा सोशल मीडियावर फनी रिल्स पोस्ट करताना दिसते. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांचे अनेक व्हिडीओ आपण पाहत असतो. इतकंच नाही तर त्यांचा स्टेज प्रेझेंस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, आता भारतीच्या एका व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे अनेकांनी कमेंट करत तिला दुसऱ्या बाळासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती आणि हर्षचं एक युट्यूब चॅनल असून त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत त्यांच्या घरी अभिनेत्री आणि त्यांची खास मैत्रिण जास्मिन भसीन देखील पोहोचल्याचं दिसत आहे. त्या व्हिडीओत भारती, हर्ष, गोला आणि जास्मिन मस्ती करताना दिसत आहे. त्यावेळी गोला अचानक जास्मिनच्या डोक्याची मसाज करताना दिसतो. त्या मसाजनंतर जास्मिन खूप आनंदी होते. तर दुसरीकडे भारती लगेच तिला बोलते की जस्मिन लवकर लग्न कर. हे ऐकताच जास्मिन भारतीला उत्तर देत बोलते की भारती, तू लवकर दुसऱ्या बाळाची प्लॅनिंग कर, गोलासाठी एक छोटा भाऊ किंवा बहिण घेऊन ये.' जास्मिन असं बोलताच भारती लगेच तिच्या पोटावरून हाथ फिरवताना दिसते. भारतीचं हे कृत्य पाहिल्यानंतर अनेकांनी तिला तिच्या बाळासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. खरंतर लग्नाच्या चार वर्षांनंतर भारती आणि हर्ष हे आई-वडील झाले आहेत. तर हर्ष आणि भारतीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला देखील त्यांनी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असे म्हटले आहे. 


हेही वाचा : Ramesh Deo Love Story : जेव्हा दुसऱ्यासोबत जुळवताना स्वतःच सीमाच्या प्रेमात पडले रमेश देव...



गेल्यावर्षी भारतीनं लक्ष्य म्हणजेच गोलाला जन्म दिला. तेव्हापासून ते तिघंही त्यांच्या आनंदी आयुष्याला जगत आहेत. आता त्यांच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर काही दिवसांपूर्वीच भारती ही बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' या शोमध्ये दिसली होती. यावेळी भारतीनं पुन्हा एकदा आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या चॅट शोमध्ये भारती म्हणाली की 'मला पुन्हा आई व्हायचे आहे. मी आयुष्याचा हा टप्पा खूप एन्जॉय करत आहे. मला खरंच मज्जा येत आहे. मी माझ्या मुलासोबत खूप खेळते आणि त्याच्यासोबत खूप मजा करते.'