Ramesh Deo Love Story : जेव्हा दुसऱ्यासोबत जुळवताना स्वतःच सीमाच्या प्रेमात पडले रमेश देव...

Seema Deo Death: सीमा या गेल्या तीन वर्षांपासून त्या स्मृतीभंश (एलझायमर) या आजारानं ग्रस्त होत्या. त्यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 24, 2023, 12:30 PM IST
Ramesh Deo Love Story : जेव्हा दुसऱ्यासोबत जुळवताना स्वतःच सीमाच्या प्रेमात पडले रमेश देव... title=
(Photo Credit : Social Media)

Seema and Ramesh Deo Love Story : बॉलिवूड अभिनेता रमेश देव यांचे गेल्या वर्षी 2 फेब्रुवारी रोजी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानं देव कुटुंबावरावर शोककळा पसरली होती. त्यात आता त्यांची पत्नी सीमा देव यांचे आज 24 ऑगस्ट रोजी वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या दोघांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर बॉलिवूडमध्ये त्यांना सहायक कलाकार म्हणून काम केले. ते दोघं आज या जगात नसले तरी देखील त्यांच्या आठवणी आणि त्यांची लव्ह स्टोरी ही नेहमीच आपल्या सगळ्यांच्या आठवणीत राहिल. चला तर जाणून घेऊया त्यांच्या लव्ह स्टोरी विषयी...

रमेश देव हे त्यांच्या पत्नीपेक्षा वयानं जवळपास 12 वर्षे मोठे होते. इतकंच नाही तर ते राजपूत सिसोदिया कुटुंबातील होती. त्यांनी 1950 च्या सुरुवातीला मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या करिअरला सुरुवात केली. रमेश देव यांनी चित्रपटात अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या. त्यानंतर त्यांना हळू-हळू मोठ्या भूमिके मिळू लागल्या. तर हाच काळ होता जेव्हा मराठी चित्रपटात स्वत: ची जागा मिळवण्यासाठी नलिनी सराफ यांनी त्यांचं नाव बदलतं सीमा असं ठेवलं. 1960 मध्ये त्यांच्याकडे पहिला चित्रपट आला. त्या चित्रपटाचं नाव ‘जगच्या पथिवार’ असं होतं. या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सीमा यांच्यासोबत त्या चित्रपटात रमेश देव हे देखील होते. या चित्रपटातील त्यांच्या या दोघांच्या भूमिकांनी सगळ्यांची मने जिंकली.

हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन 

या चित्रपटानंतर जवळपास दोन दशक रमेश आणि सीमा यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचे अनेक चित्रपट हिट झाले, तर त्यांच्या भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. दरम्यान, 1962 साली प्रदर्शित झालेल्या ‘वरदक्षिणा’ या चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांना एकमेकांना असलेल्या प्रेमाविषयी कळलं. त्याचं झालं असं की रमेश यांची जी भूमिका होती त्यांना सीमा यांना एका दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यासाठी मदत करायची होती. त्याचवेळी त्यांना एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली. त्याचं वर्षी त्या दोघांनी लग्न देखील केलं. 

1 जुलै 2013 मध्ये त्यांच्य लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी रमेश देव म्हणाले होते की 'माझी सीमासोबत असलेली केमिस्ट्री खूप सुंदर आहे. आमचा अभिनय आणि भूमिका या खूप नॅच्युरल वाटतात. कारण माझी सहकलाकार ही खूप मस्ती करणार आहे. आमच्या ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीविषयी बोलायचे झाले तर आम्ही 1 जुन रोजी आमच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण केलीत. त्यातूनचं आम्हाला आमची केमिस्ट्री दिसते. मला वाटतं नाही की चित्रपटसृष्टीत आमच्या पेक्षा जुनं कोणतं जोडपं आहे आणि आम्ही अजूनही सोबत आहोत.' 

या जोडप्यानं चाहत्यांसमोर एक कपल गोल सेट केलं असं म्हणायला हरकत नाही. रमेश यांनी त्यांच्या लग्नाच्या 52 व्या वर्षी पत्नी सीमाला डायमंडची एक सुंदर बांगडी दिली होती. याविषयी बोलताना सीमा म्हणाल्या, ते मला मुंबईतील एका सोनाराकडे घेऊन गेले. शॉपिंग करायची म्हटल्यावर ते खूप उत्सुक असतात, पण तरी देखील ते मला गिफ्ट देण्यावर भर देतात. मला खूप महागडे गिफ्ट आवडतं नाही. ते मला इमोश्नल ब्लॅकमेल करतात आणि म्हणतात, मी तुझ्याजवळ उद्या असेल नसेल, त्यामुळे मला आज तुझ्यासाठी हे खरेदी करायचं आहे. त्यानंतर आम्ही आमच्या मुलांसोबत डिनरला गेलो होतो. यावेळी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सीमा म्हणाल्या होत्या की त्यांनी आमच्या लग्नच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला डायमंड इयरिंग्स आणले होते. तेच इयररिंग्स मी गेल्या 52 वर्षांपासून वापरते.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सीमा आणि रमेश यांच्या मुलांविषयी बोलायचे झाले तर त्यांना दोन मुलं असून अजिंक्य देव आणि अभिनय देव अशी त्यांची नावं आहेत. अजिंक्य आता मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय करताना दिसतो. तर त्यासोबतच तो दिग्दर्शक, लेखक म्हणून देखील काम करतो. त्याला त्याच्या बॉलिवूड चित्रपटांसाठी देखील ओळखलं जातं.