मुंबई : कॉमेडियन भारती सिंग एका शोमध्ये पोहोचली आणि तिथे कोणताही मजा मस्ती नाही असं होऊच शकत नाही. अलीकडे, ती 'बिग बॉस' 15 च्या वीकेंड का वार भागात पती हर्ष लिंबाचियासोबत 'हुनरबाज' शोच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी शोमध्ये मिथुन चक्रवर्ती देखील उपस्थित होते जे 'हुनरबाज'ला जज करताना दिसणार आहेत. 'बिग बॉस'मधील या शो दरम्यान भारती सिंहने मिथुन चक्रवर्तीसोबत खूप धमाल केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीने खोलली मिथुन यांची पोल
भारती सिंगने 'हुनरबाज'साठी मिथुनच्या कॉन्ट्रॅक्ट क्लॉजचा खुलासा केला, जो ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. भारती सिंह मिथुन यांच्या स्टाईलमध्ये पहिल्या क्लॉज सांगते म्हणते, माझ्या आजूबाजूला फक्त मुलीच मुली असाव्यात. मी मुलांकडून ब्रीफिंग घेत नाही. हे ऐकून मिथुन म्हणतात, ''हे काय आहे? कधी म्हटलं होतं? मग पुढे ते म्हणतात, घरात भांडणं लावून सोडेल ही माझ्या यार''.



माझ्या घरी भांडण लावणार काय? 
यानंतर भारती मिथून यांच्या दुसऱ्या क्लॉजबद्दल म्हणते, जर मी शोमध्ये जज करेन तर, मागे फक्त मुली असाव्यात. एकाही मुलाने टाळ्या वाजवू नये, मला त्यात मजा येत नाही. यादरम्यान सलमान खानही भारती सिंगला सपोर्ट करताना दिसत आहे. तो म्हणाला काही शंका? त्यावर मिथुन म्हणतात, ये, ये. तुही सहभागी होऊ शकतोस.