मुंबई : बऱ्याचदा लोक बाह्य सौंदर्याबाबत सर्वात जास्त बोलताना आणि चर्चा करताना दिसतात. पण जेव्हा आंतरिक सौंदर्याबाबतची चर्चा होते, तेव्हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एका चुलबुल्या मुलीचा चेहरा समोर येतो. जी पंजाबच्या अमृतसर येथून मुंबईला आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आली होती. आणि आज इंडस्ट्रीत तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून कॉमेडी क्वीन भारती सिंग आहे. जी आपल्या दमदार कॉमेडी टायमिंगच्या जोरावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल आणते.भारतीला तिच्या वजनामुळे बऱ्याचदा ट्रोल केलं गेलं. पण तिने निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं नाही आणि आपल्या टॅलेंटच्या जोरावर घरघरात ही भारती सिंग पोहोचली. आज भारतीचा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने भारतीच्या जन्मासोबत निगडीत असलेली एक गोष्ट समोर आली आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना ठावूक असेल.


भारतीचा जन्म 3 जूलै 1985 मध्ये झाला. एका मुलाखतीत भारतीने सांगितलं की, "फॅमिलीचा माझ्या जन्माला विरोध होता. त्यावेळी ‘हम दो हमारे दो’ची मोहिम सुरु करण्यात आली होती. माझ्या अगोदर माझ्या भावा-बहिणीचा जन्म झाला होता, मी तिसरी मुलगी होते." पुढे भारती सांगते, माझी आई मला अजूनही सांगते, "मी तुला जन्म देणार नव्हते, कारण आधीच दोन मुलं असणंच योग्य होतं." 


आईने खूप औषधं आणि गोळ्या घेतल्या होत्या. पण ती हे तिसरं मुलं पाडू शकली नाही.आज जेव्हा माझ्या कामाचं कौतुक होतं, मला अवॉर्ड मिळतो,तेव्हा आई सारखी म्हणते, माझ्या हातून मोठं पाप होणार होतं.