मुंबई : आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात आहे. देशभरात भीमसैनिकांनी अनेक माध्यमातून बाबाहेबांना आदरांजली वाहिली आहे. यामध्ये कलाकारही मागे नाहीत. गायिका कविता राम यांनीही हटके अंदाजामध्ये आपली आदरांजली वाहिली आहे.  


युट्युबवर हटके अंदाज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. अनेक हिंदी मालिकांसाठी तसेच मराठी सिनेमांसाठी पार्श्वगायन कविता यांनी केले आहे. कविता यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ट्रिब्यूट करणाऱ्या वेगवेगळ्या पाच गाण्यांचे फ्युजन सॉंग्स अपलोड केले आहेत. ही पाचही गाणी कविता राम यांनी गायली आहेत. 


कविता यांनी गायलेली ही गाणी मुळात उत्तरा केळकर, आनंद शिंदे, शाहीर विठ्ठल उमप यांनी गायली आहेत.  कविता यांनी "ये रिश्ता क्या कहलाता है", "गोदभराई", "मेरे घर आयी एक नन्हीं परी" "कैरी" " साथ निभाना साथिया"  या मालिकांसाठी तर "या टोपीखाली दडलंय काय", "लाज राखते वंशाची", "दुर्गा म्हणत्यात मला", "शिनमा" "थँक यू विठ्ठला", "नगरसेवक" "हक्क", "लादेन आला रे" यांसारख्या मराठी तर "गब्बर इज बॅक", "सिंग इज किंग" या हिंदी सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. 


 



फ्युजन अंदाजात सादरीकरण 


या जुन्या गाण्यांना नव्या रूपात म्हणजेच फ्युजनच्या रूपात सादर करून कविता यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी आदरांजली दिली आहे. कविता यांनी केलेल्या या नव्या फ्युजनच्या सादरीकरणाबद्दल आनंद शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.