मुंबई : काही अभिनेत्री किंवा कलाजगतातील काही चेहरे हे त्यांच्या कामापेक्षा चेहऱ्यावर असणाऱ्या सौंदर्यासी जास्त ओळखले जातात. एका भोजपूरी अभिनेत्रीसोबत सध्या तसंच होत आहे. तिचा चेहरा आणि तिचं सौंदर्य इतकं लाघवी आहे, की पाहणाऱ्यांची नजर काही केल्या तिच्यावरुन हटताना दिसत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड सौंदर्यवतींना ती टक्कर देताना दिसत आहे. ही रुपवान अभिनेत्री आहे, अलायना दत्ता. तिचा प्रत्येक फोटो पाहिल्यानंतर  नेटकरी थांबून थांबून तोच फोटो पाहताना दिसतात.


अलायनानं काहीही न करता, तिच्या नजरेचा अवघा एक बाण सर्वांना जागीच खिळवून ठेवण्यास पुरेसा आहे. वेस्टर्न, इंडो वेस्टर्न किंवा आणखी एखादा नवा लूक, अलायनाला सर्वकाही शोभून दिसतं.




भोजपूरी कलाजगतामध्ये तिच्या नावाला बरीच प्रसिद्धी आहे. सोशल मीडियावरही तिला बरीच लोकप्रियता मिळताना दिसते.




बोल्डनेसचं म्हणाल तर कमनीय बांधा आणि कमालीचं सौंदर्य याची जणू तिला देणगीच लाभली आहे. विश्वास बसत नाही, तर तिचे फोटो नक्की पाहा.