नवी दिल्ली : भोजपुरी सिनेमाचा मेगास्टार दिनेशलाल यादव 'निरहुआ'चा 'निरहुआ हिंदुस्तानी ३' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या सिनेमात निरहुआसोबत आम्रपाली दुबे आणि शुभि शर्मा यांची जोडीही दिसणार आहे. ट्रेलरमध्ये आम्रपाली दुबेच्या ज्या गाण्याची झलक पाहायला मिळाली होती ते गाणं आता प्रदर्शित झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'काय पण तू मला बोलू नको... इकडे तिकडे फिरू नको' अशा मराठी शब्दांनी या गाण्याची सुरुवात होतेय. या गाण्यात आम्रपाली दुबे पुन्हा एकदा थिरकताना दिसतेय. 


युट्युब क्वीन आम्रपाली दुबे नाव भोजपुरी जगतात प्रसिद्ध आहे. आपल्या आगामी सिनेमासाठी आम्रपालीनं आपलं वजन घटवल्याचंही पाहायला मिळतंय.