Akanksha Dubey News: प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांशा दुबे (Akanksha Dubey) हीने बनारसमध्ये एका हॉटेल रुममध्ये (Hotel room) गळफास घेत आत्महत्या केली. 25 वर्षाच्या आकांक्षाने टोकाचं पाऊल उचलल्याने सध्या मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता आकांक्षा दुबेची मेकअप आर्टिस्टने मोठा खुलासा केलाय.


काय म्हणाली मेकअप आर्टिस्ट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकांक्षा दुबेची मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) रेखा मौर्याने खुलासा केला आहे, आकांक्षा तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. मात्र, मेकअप आर्टिस्टने या पार्टीबाबत फारशी माहिती दिली नाही.


हॉटेलमध्ये गेलेला 'तो' तरुण कोण?


हॉटेलमध्ये पार्टी करून आकांक्षा उशिराने 1.55 वाजता परतली होती. ती परत आली तेव्हा तिला सोडण्यासाठी एक तरुणही तिच्यासोबत आला होता, अशी माहिती हॉटेल मॅनेजरने दिली आहे. सोबत आलेला तरुण त्यांना खोलीत घेण्यासाठी हॉटेलच्या आत गेला. तरुण 17 मिनिटे अभिनेत्रीसोबत खोलीत थांबला होता. त्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडला, अशीही माहिती मिळाली आहे.


आणखी वाचा - 'जमलंय बरं का... यायला लागतंय; Akash Thosar अडकणार लग्नबंधनात?


आकांक्षा दुबेच्या खोलीचा दरवाजा सकाळी उघडला, तेव्हा लाईट देखील चालू होती आणि बाथरूमचा नळही उघडा होता. अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी (UP Police) तपास सुरू केला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by (@akankshadubey_official)


आकांक्षा होती डिप्रेशनची शिकार


चार वर्षापूर्वी म्हणजेच 2018 साली आकांक्षाने नैराश्यामुळे (Depression) फिल्मी करियरला रामराम ठोकला होता. त्यानंतर आता ती पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार होती. मात्र, त्याआधीच तिने टोकाचं पाऊल उचललंय.