मुंबई : सिनेमातील कलाकाराकडे कायम आदराने पाहिलं जाते. अनेक जण तर कलाकारांना आपल्या आयुष्यात आदर्श मानत असतात. पण असं असताना जेव्हा एक कलाकार चुकीच्या गोष्टी करतात त्याचा परिणाम समाजावर वेगळाच होत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोजपुरी सिनेमातील (Bhojpuri Cinema) एका अभिनेत्याला दक्षिण पूर्व दिल्लीतील AATS च्या टीमने मंगळवारी अटक केली आहे. हा अभिनेता खोट्या नोटांचा रॅकेट (mastermind 50 lakhs fake note) चालवणारा मास्टरमाइंड आहे. दिल्ली पोलिसांनी यासोबत 50 लाख रुपयाच्या खोट्या नोटा आणि दोन चोरीची बाइक जप्त केली आहे. 



आरोपी मोहम्मग शाहिद उर्फ राज सिंह उर्फ ललन आणि सैयद जैन हुसैनला अटक केली आहे. आरोपी शाहिद भोजपुरी फिल्म 'इलाहाबाद से इस्लामाबाद' (Allahabad se Islamabad) या सिनेमात काम केलं आहे. 


अनेक गाण्यातही काम केलंय 


मिळालेल्या माहितीनुसार, AATS चे इंस्पेक्टर कैलाश बिष्टने आंतरराज्यीय ऑटो फिल्टर गँगचा पर्दाफाश केला आहे. गँगचा मास्टर माइंड आरोपी मोहम्मद शाहिद उर्फ राज सिंह उर्फ ललन आणि सुयैद जैन हुसैनला अटक करण्यात आलं आहे. आरोपी शाहिद भोजपुरी सिनेमासोबतच भोजपुरी गाण्यातही काम केलं आहे.