Bhojpuri movie took over Tiger Shroff's Ganpath : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा गणपत हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी तब्बल 200 कोटी खर्च केले. तर टायगरच्या 'गणपत' नं जवळपास 10 कोटी रुपये कमावले आहेत. तर टायगरला भोजपुरी अभिनेत्यानं मागे टाकलं आहे. चित्रपट निर्माता रत्नाकर कुमार यांनी हिंमत्त करत भोजपुरी चित्रपटसृष्टीतील स्टार खेसरीलाल यादवसोबत ‘संघर्ष 2’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यांचा हा चित्रपट सुपर डूपर हिट ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे जिथे 'गणपत' ज्या थिएटरमध्ये आला आहे तिथे काहीच गर्दी नाही आहे तर दुसरीकडे भोजपुरी चित्रपट ‘संघर्ष 2’  पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. हा चित्रपट हाऊसफूल ठरत आहे. प्रोड्यूसर रत्नाकर कुमार कोटीं खर्च करत या चित्रपटाची निर्मिती केली. पण त्यांचा हा निर्णय योग्य ठरला असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याच काळानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी महिला त्यांच्या कुटुंबासोबत चित्रपटगृहात येत आहेत. यानं भोजपुरी चित्रपटसृष्टीला आनंद होत आहे. त्यासाठी निर्मात रत्नाकर कुमार यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहे. त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की 'संघर्ष 2' हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यासाठी सगळ्या टीमनं खूप मेहनत घेतली आहे. 


दरम्यान, ‘संघर्ष 2’  हा कौटुंबिक चित्रपट आहे. त्यात देशावर असलेले प्रेम स्पष्ट पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन पराग पाटील यांनी केले आहे. खेसारीलाल यादव आणि त्याची लेक कृती यादव या चित्रपटात एकत्र दिसले आहेत. तर त्या दोघांचा एकत्र असा एक डायलॉग असून त्यानं सगळ्यांची मने जिंकली आहे. या चित्रपटात खेसारीलाल यादव, मेघाश्री आणि माही श्रीवास्तव यांच्या दमदार भूमिका आहेत. 


हेही वाचा : 33 वर्षांनी अमिताभ आणि रजनीकांत येणार एकत्र; थलायवा पोस्ट शेअर करत म्हणाले 'माझे मेन्टॉर....'


टायगर श्रॉफच्या 'गणपत' विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही वाशु भगनानी, जॅकी श्रॉफ, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी केली आहे. तर हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.