अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी `या` अभिनेत्याला अटक
Minor Rape Case Filed Againts an Actor : या अभिनेत्यानं 3 वर्षांपूर्वी एका 13 वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केला होता. त्यानंतर आता त्यानं सोशल मीडियावर तिचे काही आक्षेपार्ह फोटो शेअर केले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी याविषयी विचारता तिनं संपूर्ण घटना सांगितली आहे.
Bhojpuri Actor: भोजपुरी गायक अभिषेक उर्फ बाबुल बिहारीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याप्रकरणी अटक झाली आहे. इतकंच नाबी तर तिचे आक्षेपार्ह फोटो देखील त्यानं सोशल मीडियावर शेअर केले असे म्हटले जाते. ही घटना गुढगाव येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबुल हा राजीव नगरच्या परिसरात राहत होता. येथेच बाबुलनं 13 वर्षांच्या मुलीशी मैत्री केली आणि गोड बोलत तिला मोहात पाडून राजीव नगरमधील एका हॉटेलच्या रुमवर घेऊन गेला. त्यानंतर बाबुलनं तिचे फोटो क्लिक करत सोशल मीडियावर शेअर केले. या प्रकरणी अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांची पोलिस चौकशी करत आहे.
आरोपी मुलीनं या घटनेविषयी कोणाला सांगितलं नाही आणि आरोपीपासून लांब राहत होती. याविषयी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, आरोपीनं काही दिवसांपूर्वी त्या पीडीत मुलीचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले. हे फोटो पाहिल्यानंतर अल्पवयीन मुलीची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तिनं संपूर्ण घटना सांगितली आणि बुधवारी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात जाऊन बाबुल विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत बाबुल बिहारीला बुधवारी (7 जून) अटक केली. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी पीडित मुलीला काऊंसिलिंगसाठी पाठवले. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल केल्याच्या काही तासात बाबुलला अटक करण्यात आली. तर ते लवकरच बाबुलला कोर्टात हजर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बाबुल बिहारी हा 21 वर्षांचा आहे. तर तो बिहारमध्ये राहणारा आहेत. तर त्याचं खरं नाव अभिषेक आहे. तर त्याचे यूट्युब चॅनलवर 27 हजार फॉलोवर्स आहेत. तर त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये गायक व अभिनेता असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा : 57 व्या वर्षी लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना Ashish Vidyarthi यांनी सुनावलं; म्हणाले, "मला बुड्ढा खूसट..."
या आधी बॉलिवूड अभिनेता शायनीवर त्याच्या मोलकरणींन 2009 साली बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर त्याला ही अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. खरंतर या महिलेनं आपल्या जबानीत शायनीला निर्दोष ठरवत शायनीच्या घरी काम मिळवून देणाऱ्या महिलेच्या सांगण्यावरून तक्रार केल्याचे सांगितले. यानंतर शायनीची जामिनावर सुटका झाली. त्याच्या 3 महिन्यानंतर शायनीला जामिनावर सुटका मिळाली. पण पीडित महिलेनं आरोप मागे घेतल्यानंतरही 2011 मध्ये न्यायालयानं शायनीला 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती.