Actress Tabu Hot Photoshoot: नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू (Tabu). गेल्या अनेक वर्षात तब्बू हिनं हिट चित्रपटांतून काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अनीस बज्मीच्या भुल भुलैया 2 या चित्रपटात मंजुलिकाची भुमिका साकारून तिला प्रेक्षकांप्रमाणेच समीक्षकांचेही कौतुक मिळाले आहे. (bhool bhulaiyya actress tabus recent bold photoshoot goes viral see video and photos on instagram)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बू आपल्या विलक्षण सौंदर्यांसाठीही ओळखली जाते. नुकतंच तिनं तिच्या इन्टाग्राम पेज वरून आपलं बोल्ड फोटोशूट शेअर केलं आहे ज्यात तब्बू विलक्षण सुंदर दिसत आहे. काळ्या आऊटफिटमधील हे फोटोशूट चाहत्यांच्या नजरा तिच्याकडेच वळवतं आहेत. 


तब्बूने तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवरून एक मॉन्टाज व्हिडीओ पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये तिनं काळ्या रंगाचा लांब रॅप-अप ड्रेस घातला आहे. तब्बूनं न्यूड मेकअपही केला आहे. सोनेरी इयरिंग्स आणि अंगठी एक्सेसरीज म्हणून परिधान केली आहे. या फोटोत तब्बू खूपच आकर्षक दिसते आहे. तिच्या या व्हिडीओला आतापर्यंत 30 हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.



व्हिडीओसोबत तिनं आपल्या फोटोशूटचा फोटोही पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोनं इंटरनेटचं तापमान तर वाढवलं आहेच पण त्याचसोबत तिच्या या फोटोशूटवर चाहतेही कमेंट्सचा पाऊस करत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तब्बू लवकरच दृश्यम 2 (Drishyam 2) या चित्रपटातून दिसणार आहे. या चित्रपटात तब्बूसह अजय देवगण, श्रिया सरन, इशिता दत्ता यांसारखे स्टार्स आहेत.