मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कामातून मोकळा वेळ मिळताच स्वतःला ब्रेक द्यायला ती कधीच विसरत नाही. आता तिने अशाच काही खास क्षणांची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोंमध्ये अभिनेत्री बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाच्या बिकिनीमध्ये धुमाकूळ घालत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. या फोटोंमध्ये भूमी किलर स्माईल देत चाहत्यांची मने लुटत आहे. भूमीच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिने लाल रंगाचा ब्रॅलेट घातला आहे.


यावर अभिनेत्रीने शर्ट घातला आहे. मेक-अपबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्रीने हलक्या शेडमध्ये लिपस्टिक लावली आहे आणि तिचे केस मागच्या बाजूला बांधले आहेत. यावर अनेक चाहते दिलखेचक प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिलं आहे की, 'birthday month'.


18 जुलैला भूमीचा वाढदिवस आहे. फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, अभिनेत्री तिच्या वाढदिवसाबाबत किती उत्साही आहे. ही अभिनेत्री लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत अफवा या चित्रपटात दिसणार आहे.



वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, भूमी पेडणेकर शेवटची राजकुमार राव सोबत 'बधाई दो'मध्ये दिसली होती. 'रक्षाबंधन' आणि 'मिस्टर लेले' हे भूमीचे आगामी चित्रपट आहेत. रक्षाबंधनमध्ये ती अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.