`उर्फी 2.O...` साप आणि प्लास्टिकचा टॉप...; भूमि पेडनेकरचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Bhumi Pednekar Trolled : भूमि पेडनेकरनं केलेल्या त्या स्टाइलमुळे नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
Bhumi Pednekar Trolled : बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडनेकर ही नेहमीच तिच्या कामापेक्षा तिच्या हटके अंदाजामुळे किंवा तिच्या यूनिक फॅशन सेंसमुळे ती चर्चेत असते. तिच्या हटके आउटफिट्समुळे नेहमीच ती लोकांचं लक्ष वेधते. भूमिनं नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पुन्हा एकदा तिच्या फॅशन सेन्सची चर्चा सुरु झाली आहे. तिच्या या फोटोंवर नेटकरी हटके कमेंट करत आहेत.
भूमिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत भूमिनं कॅप्शन दिलं आहे की सुरक्षा कवच घालून सिंड्रेला तयार आहे. भूमिचे हे फोटो आयफा अवॉर्ड्स 2024 दरम्यानचे आहेत. या कार्यक्रमासाठी भूमिनं एथनिक लूक निवडला आहे, पण ते असं काही होतं ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. आयफा फेस्टिव्हल 2024 नुकताच अबू धाबीमध्ये झाला. दाक्षिणात्य कलाकारांपासून बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ज्यापैकी एक भूमि पेडनेकर आहे. तिच्या लूकवरून सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल करण्यात येत आहे. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की ती अजूनही तिच्या नागिन युगात आहे. त्याचं कारण काय असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं कारण तिनं परिधान केलले कपडे आहेत.
आयफा अवॉर्ड्स 2024 साठी भूमि पेडनेकरनं सगळ्यात हटके लूक निवडला होता. ज्यावरून तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'पुरुष मेल्यानंतर भूत होतो आणि महिला मेल्यानंतर चेटकीन होते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सध्याच्या काळात आपल्या शरीराचा काही भाग दाखवत लोकप्रियता आणि सगळ्यांचं लक्ष वेधतात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'उर्फी जावेद इन्स्प्यार आहे.'
हेही वाचा : वाढदिवस रणबीर कपूरचा मात्र, राहाच्या 'या' 6 फोटोंनी वेधलं सगळ्यांचं लक्ष!
तिच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती सगळ्यात शेवटी ‘भक्षक’ मध्ये दिसली होती. हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. भूमि ही बी-टाउनच्या एका टॅलेन्टेड आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याशिवाय ती ‘टायलेट एक प्रेमकथा’, ‘बधाई दो’, ‘शुभ मंगल सावधान’ और ‘सांड की आंख’ या चित्रपटात दिसली होती. आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे सगळ्यांचे लक्ष आहे.