काही महिन्यांतच भूमी पेडणेकरनं घटवलेलं 32 किलो वजन; तुम्हीही प्रयत्न करताय तर हे वाचा
सेलिब्रिटी स्व:ताला फिट ठेवण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात.
मुंबई : सेलिब्रिटी स्व:ताला फिट ठेवण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री भूमी पेडणेकर स्व:तच्या फिटनेसची काळजी कशी घेते याबद्दल सांगणार आहोत. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचं नाव आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. भूमीची गणना बॉलिवूडमधील फिट आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते.
'दम लगा के हैशा' या चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. विशेष म्हणजे या चित्रपटात भूमी पेडणेकरने जाड मुलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी भूमीने तिचे वजन ९० किलो वाढवलं होतं. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच भूमीच्या ट्रांन्सफॉर्मेशनने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जवळ-जवळ 32 किलो वजन त्यावेळी अभिनेत्रीने कमी केलं होतं.
मॉर्निंगमध्ये डिटाक्स वॉटर
भूमी पेडणेकरने सांगितलं की, ती रोज सकाळी एक ग्लास गरम पाणी घेते. आणि त्यानंतर डिटॉक्स वॉटर घेते. डिटॉक्स वॉटरदूषित तत्व बाहेर टाकतं. त्यामुळे शरीर स्वच्छ होतं. डिटॉक्स वॉटरमध्ये लिंबू, पुदिना तसंच काकडी यांचा समावेश असतो. अभिनेत्रीने सांगितलं की, 1 लिटर पाण्यात काकडीचे 3 तुकडे, पुदिन्याची ताजी पाने, 4 चिरलेली लिंबू घालून काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि काही तासांनी ते पिऊन घ्या. भूमीने सांगितलं की, यानंतर ती जिममध्ये किंवा घरीच व्यायाम करते. जिममध्ये ती कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगला पर्यायी दिवस देते. अभिनेत्रीने चाहत्यांना असंही सांगितलं की, जर तुम्ही जिममध्ये जात नसाल तर तुम्ही घरी योगासनं, फास्ट वॉक, स्क्वॅट करू शकता.
व्यायाम केल्यानंतर
भूमीने सांगितलं की, व्यायामानंतर ती पाच उकडलेली अंडी खाते. कारण प्रोटीन शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतात.
दुपारचं जेवण
यानंतर भूमी पेडणेकरनेही तिच्या लंचबाबत खुलासा केला आहे. भूमीने सांगितलं की, ती दुपारच्या जेवणात घरी बनवलेलं साधं जेवण करते. ज्यामध्ये मसूर, भाजी, रोटी यांचा समावेश असतो. जे काही आरोग्यदायी असतं. ती बाजरीची रोटी, ज्वारी, हरभरा किंवा नाचणी अशा गोष्टी खाते. त्यांच्यासोबत अभिनेत्रीही हलकं बटर वापरायची. अभिनेत्रीची भाजीसाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करते. याशिवाय ती जेवणानंतर दही आणि ताक घेते. अभिनेत्रीने सांगितलं की, कधीकधी ती दुपारच्या जेवणात ग्रील्ड चिकन, ग्रील्ड चिकन सँडविच खाते.
दुपारचा स्नॅक्स
दुपारच्या स्नॅक्समध्ये, 4.30 च्या सुमारास, भूमी पपई किंवा पेरू खाते. यानंतर थोड्याच वेळात ग्रीन टी आणि बदाम किंवा अक्रोड खाते.
संध्याकाळचा नाश्ता
सलाड व्यतिरिक्त, अभिनेत्री संध्याकाळी 7.30 वाजता स्नॅक्समध्ये फळं खाते.
रात्रीचे जेवण
भुमी रात्री आठ वाजेपर्यंत तिचं जेवण करते. तिच्या डिनर डाएटचं रहस्य सांगताना भूमीने सांगितलं की, ती व्हेज खाताना कमी पनीर, टोफू, हलक्या शिजवलेल्या भाज्या किंवा वाफवलेल्या भाज्या घेते. यासोबत थोडा ब्राऊन राइस पण घ्या. शक्यतो रात्री हलका आहार घ्यावा कारण रात्री पचनसंस्था मंद काम करते.