भूषण प्रधान आणि भाग्यश्री लिमये रिलेशनशिपमध्ये?
मराठी इंडस्ट्रीत आणखी एका नव्या जोडीची चर्चा
मुंबई : मराठी इंडस्ट्रीत आणखी एका नव्या जोडीची चर्चा आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) आणि अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा (Relationship) रंगली आहे. नुकताच ७ नोव्हेंबरला भाग्यश्रीचा वाढदिवस झाला. या वाढदिवसादिवशी भूषण प्रधानने लिहिलेली पोस्ट या चर्चेला कारण ठरली आहे.
भाग्यश्रीच्या वाढदिवसादिवशी भूषणने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. यामधून त्याचं तिच्याबद्दलचं प्रेम व्यक्त होतंय. पण अद्याप या दोघांनी आपल्या प्रेमाची कुठेही अधिकृती घोषणा केलेली नाही.
सोशल मीडियावर या दोघांचे पोस्ट आणि व्हिडिओ हे नातं खूप खास असल्याचं स्पष्ट करतात. पण या दोघांनी या नात्याची कबुली दिलेली नाही. असं वाटतं की या दोघांनी आपलं नातं अजून जाहिर करायचं नाही. पण सोशल मीडियावर ते आपलं प्रेम लपवू शकलेले नाहीत.
भाग्यश्रीने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केलेली त्यामध्ये तिने,'..आणि तू नेहमीच माझा दिवस खास बनवतोस.' असं म्हणत आपली भावना शेअर केलेली.
तसेच भूषणने भाग्यश्री लिमयेच्या वाढदिवसदिवशी एक खास पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्याने,'मी किती खास आहे याची जाणीव तू मला कसं करून देते हे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. तू जशी आहेस तशीच राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा '
या अगोदरही भूषण, भाग्यश्री आणि प्रार्थना बेहेरेचे आऊटिंगचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यावेळी देखील या दोघांच्या नावाची चर्चा झाली होती. पण अजूनही या दोघांनी आपल्या प्रेमाचा, नात्याचा खुलासा केलेला नाही.