मुंबई : सोमवारी दिल्लीच्या विज्ञान भवनात राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कला विश्वात अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मात्र उपस्थित नव्हते. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार होते. पण त्यांच्या तब्येतीमुळे त्यांना पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहता आले नाही. 



याची खंत खुद्द बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली. 'मला ताप आल्यामुळे मी राष्ट्रीय पुरस्कार सोहळयात उपस्थित राहू शकलो नाही. शिवाय डॉक्टरांनी प्रवास करायला नकार दिला आहे.' त्यामुळे पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 



त्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अमिताभ यांना दादा साहेब फाळके हा पुरस्कार २९ डिसेंबर रोजी देण्यात येणार असल्याचे जाहिर केले. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.  


यावेळी 'नाळ' या चित्रपटासाठी श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे श्रीनिवाससह इतर तीन बालकलाकारांचाही गौरव करण्यात आला.