VIDEO : शिल्पा शिंदेला आकाशने केलं जबरदस्ती KISS
बिग बॉसच्या घरी मंगळवारच्या एपिसोडमध्ये आकाश डडलानीने शिल्पा शिंदेसोबत अशी गोष्ट केली की ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा झाली.
नवी दिल्ली : बिग बॉसच्या घरी मंगळवारच्या एपिसोडमध्ये आकाश डडलानीने शिल्पा शिंदेसोबत अशी गोष्ट केली की ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा झाली.
सोशल मीडियावर शिल्पा शिंदेच्या फॅन्सने भरपूर राग व्यक्त केला. आणि प्रत्येक जण शिल्पाच्या बाजूने भांडत होते. झालं असं की, मंगळवारच्या एपिसोडमध्ये शिल्पा, पुनीश आणि आकाश गार्डन परिसरात बोलत होते. तेव्हा बोलता बोलता अचानक आकाश शिंदे तिच्या गालावर किस करतो. आकाशच्या या हरकतीमुळे शिल्पा गोंधळली. आणि तिने त्याला लगेच दूर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आकाश तिचा हात पकडून, काय करणार? असा प्रश्न विचारतो.
आकाशच्या या वागण्यामुळे शिल्पा नाराज झाल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी शिल्पा बोलते की, आकाश भरपूर मार खाणार आहे. माझ्याशी बोलू नकोस. आणि या संपूर्ण घटनेत आकाश हसताना दिसला. मात्र शिल्पा या घटनेने थोडी नाराज असल्याचं कळलं.
या घटनेनंतर शिल्पासोबतच तिचे चाहते देखील नाराज झाले. आता यामुळे बिग बॉसच्या घरी कोणतीही सुरक्षा नसल्याची चर्चा रंगली आहे. ट्विट करून चाहत्यांनी व्यक्त केला आपला राग. पाहा काय केलेत ट्विट