नवी दिल्ली : टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो चा माजी स्पर्धक विवेक मिश्रा याच्या कारला अपघात झाला. लखनऊ ते दिल्ली प्रवासादरमान्य ही घटना घडली. या दुर्घटनेत विवेक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  मात्र पोलिसांकडून त्याला वाईट वागणूक मिळाली. अशावेळी मदत न करता पोलीस फोटो काढण्यात गुंग होते, असे विवेकने सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघाताबद्दल त्याने टाईम्स ऑफ इंडियाशी बातचीत केली. त्यात त्याने असे सांगितले की, "अपघात इतका भयंकर होता की मर्सडिज कारचे अवस्था छिन्नविछिन्न अशी झाली. सुदैवाने मी त्यातून बचावलो."


विवेक योग टीचर असून न्यूड योगासाठी तो अत्यंत प्रसिद्ध आहे. 'बिग बॉस' च्या सीजन ७ मध्ये सहभागी झालेला विवेक अभिनेता कुशाल टंडनसोबत झालेल्या वादातून चर्चेत आला होता.