`...मला माफ करा`, सुसाईड नोट लिहून टीव्ही अभिनेत्रीनं संपवलं आयुष्य
चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
मुंबई : चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री सौजन्याने आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या बैंगलोरमधील तिच्या घरात बेडरूममध्ये सापडलाय. प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितलं की, खोलीचा दरवाजा आतून बंद होता. अभिनेत्रीचा मृतदेह खोलीत फासाला लटकलेला दिसला होता. अभिनेत्रीच्या पायांवर असलेल्या टॅटूच्या चिन्हांनी तिची ओळख पटली. खोलीत सापडली एक सुसाईड नोट.
सौजन्या बंगलोरमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये एकटी राहत होती.
सौजन्य बेंगलोर जिल्ह्यातील कुंबलगोडू येथील एका अपार्टमेंटमध्ये एकटी राहत होती. सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीने तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलं नाही. अशा परिस्थितीत पोलीस आत्महत्येचा शोध घेत आहेत. सौजन्या मूळची कोडगु जिल्ह्यातील कुशालनगर येथील होती. अभिनेत्री सौजन्याने हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याबद्दल तिच्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबाची माफी मागितली आहे. ही सुसाईड नोट 27 सप्टेंबर रोजी तिने लिहिली होती.
सुसाईड नोटमध्ये तिने पाठिंबा दिलेल्यांचे मानले आभार
या चिठ्ठीमध्ये अभिनेत्रीने डिप्रेशनची कबुली दिली आहे. या प्रकरणात पोलीस आता सौजन्याच्या आई -वडिलांची आणि तिच्या मित्रांची चौकशी करत आहेत. पोलिसांना हे जाणून घ्यायचं आहे की, अभिनेत्री स्वतः या परिस्थितीसाठी जबाबदार होती की ती या सगळ्यामुळे स्वत:वरच भडकली होती? सौजन्याने सुसाईड नोटमध्ये असंही लिहिलं आहे की, तिला कोणताही आजार नव्हता, पण ती मानसिक समस्यांना ग्रस्त होती. चिठ्ठीत, तिने अशा काळात ज्यांनी तिला पाठिंबा दिला त्या सर्वांगळ्यांचे आभार मानले आहेत.
कन्नड इंडस्ट्रीला मोठा धक्का
सौजन्याने अनेक प्रसिद्ध कन्नड मालिकांमध्ये काम केलं होतं. ती अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांचाही भाग राहिली आहे. सौजन्याने ज्या लोकांसोबत काम केलं आहे त्यांच्याकडून पोलिस आता सुगावा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी कन्नड उद्योगासाठीही धक्कादायक आहे. कारण काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जयश्री रमैया हिनेही आत्महत्या केली होती. मानसिक आजार आणि संघर्ष हेही तिच्या आत्महत्येमागील कारण असल्याचं मानले जात होतं. तर या वर्षाच्या सुरुवातीला 'बिग बॉस कन्नड' फेम चैत्र कुटूरनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.