बॉयफ्रेंडच्या आठवणीत रडणारी हिना आता लग्नास देतेय नकार, कारण....
बिग बॉस 11 ची स्पर्धक होती हिना खान
मुंबई : बिग बॉस 11 ची स्पर्धक होती हिना खान
हिना खान बिग बॉसच्या घरी आपल्या ब्रॉयफ्रेंडसाठी ढसा ढसा रडणारी हिना खान. आपल्या बॉयफ्रेंडसोबत निघून जाण्यास तयार असणारी हिना खान आता मात्र लग्न करायला देखील तयार नाही. घरातून बाहेर पडल्यावर हिनाला नेमकं काय झालं हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.
हिना बिग बॉसमध्ये कायम रॉकीबद्दल बोलायची.. तसेच बिग बॉसमध्ये स्पर्धकांना नातेवाईकांना भेटण्याची संधी देण्यात आली तेव्हा दोन्ही वेळेला हिनाला भेटायला तिचा बॉयफ्रेंड रॉकी आला होता. एवढंच नव्हे तर रॉकीच्या नावावरून हिनाला बिग बॉसच्या घरात चिडवले जात असे. मात्र आता घरातून बाहेर पडताच हिना आता हे नातं नाकारत आहे.
बिग बॉसमध्ये हिना कायम चर्चेत असलेली स्पर्धक आहे. कधी तिच्या कमेंटवरून तर कधी आपण काही केलंच नाही या स्वभावावरून हिना कायम चर्चेत आली आहे. घरातून बाहेर पडताच मीडियाने लग्न कधी करणार असा प्रश्न विचारल्यावर हिना म्हणाली की, लग्न तर लांबची गोष्ट आहे अजून मला बराच लांबचा रस्ता गाठायचा आहे.