मुंबई : बिग बॉसचा ११ वा सीझन आता त्याच्या अंतिम टप्प्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉस सुरूवातीपासूनच  चर्चेमध्ये होते. पण आजचं कारणं थोडं वेगळं आहे. 


शिल्पा शिंदे हीट 


'भाभीजी घर पे है' या मालिकेतील अंगुरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शिंदे पहिल्या आठवड्यापासूनच हीट ठरली आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या वाढत आहे. 



ट्विटर ट्रेन्डमध्ये शिल्पा 


काही दिवसांपूर्वी शिल्पाला पाठिंबा देण्यासाठी #ShilpaWiningHearts हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. त्यावेळेस भारतात हा ट्रेन्ड हीट आणि अव्वल ठरला होता. त्यापाठोपाठ आता शिल्पाच्या चाहत्यांनी #WeLoveShilpaShinde हा हॅशटॅगही वापरला होता.  या हॅशटॅगला १ मिलियनहून अधिक ट्विट झाले आहे. तसेच भारताप्रमाणेच जगभरातून या ट्रेन्डला प्रतिसाद मिळाला आहे. 


 


शिल्पा पहिलीच अभिनेत्री 


शिल्पा शिंदेला ट्विटरवर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. अशाप्रकारे ट्विटर  ट्रेन्डमध्ये आपलं अस्तित्त्व बनवणारी शिल्पा ही पहिलीच अभिनेत्री ठरली आहे.  


विंदू दारा सिंगचा पाठिंबा 



 


बिग बॉसचा माजी विजेता विंदू दारा सिंग यांनीही शिल्पासाठीच्या ट्विटर हॅशटॅगचा वापर करून तिला समर्थन दिले आहे.  सोबतच तिचे कौतुकही केले आहे.