नवी दिल्ली : 'बिग बॉस १२'च्या घरात भजन सम्राट अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या नातेसंबंधांची जोरदार चर्चा झाली... जसलीन - अनूप यांचे गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले प्रेमसंबंध बीग बॉसच्या घरात तीन आठवडेही टीकू शकले नाहीत... आणि अनूप यांनी जसलीनच्या बालीश हरकतींना कंटाळून या कार्यक्रमातच ब्रेकअप करण्याची घोषणा केली. हे ऐकताच जसलीन स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. कार्यक्रमाच्या एका प्रोमो व्हिडिओत हे स्पष्ट दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६५ वर्षीय अनूप जलोटा स्वत:हून ३७ वर्षांनी लहान असलेल्या जसलीन मथारूसोबत गेल्या तीन वर्षांपासून संबंधात आहेत. परंतु, बीग बॉसच्या घरात दिला गेलेला एक टास्क या दोघांच्या ब्रेकअपला कारणीभूत ठरलाय.


या घरात 'सिंगल्स'ना एक टास्क दिला जातो की ते घरात असलेल्या जोड्यांपैंकी एकाला किडनॅप करून त्याच्या सुटकेसाठी जोडीदाराकडे काही गोष्टी मागू शकतात. जोडीदारानं या मागण्या पूर्ण केल्या तरच पहिल्याची सुटका होऊ शकेल अन्यथा दोघंही नॉमिनेटेड होतील. 


यावर दीपिकानं जलोटा यांना किडनॅप केलं... आणि जसलीनकडे केस कापणे, कपडे आणि मेकअपची मागणी केली... परंतु, जसलीननं याला साफ नकार दिला... आणि दोघंही नॉमिनेट झाले...


यामुळे नाराज झालेल्या जलोटा यांनी कार्यक्रमातच जसलीनसोबत ब्रेकअपची घोषणा केली. 'जसलीनला माझ्याहून कपडे आणि मेकअप जास्त प्रिय असतील तर या नात्यात काय अर्थ... मी आता एकटाच आहे आणि ही जोडी तोडतोय' असं म्हणताना ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत.