मुंबई : लोकप्रिय टीव्ही शो 'बिग बॉस'च्या 12 व्या सिझनची विजेती दीपिका कक्कड ठरली आहे. या अगोदर विजेत्यापदासाठी श्रीसंत आणि दीपिका यांच्यात मुकाबला झाला होता. शोमध्ये टॉप 5 फायनलिस्टमध्ये दीपिका कक्कड, दीपक ठाकूर, श्रीसंत, करणवीर बोहरा आणि रोमिल चौधरी यांचा सहभाग होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात अगोदर शोमधून करणवीर बोहरा बाहेर गेला त्यानंतर रोमिल चौधरी, मग दीपक ठाकूर बाहेर गेला. दीपक या शोमधून 20 लाख रुपये बाहेर घेऊन निघाला आहे. 





दीपकने 20 लाखांची ऑफर स्विकारली कारण त्याला त्याच्या बहिणीचं लग्न करायचं आहे. त्यामुळे त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला.



फायनलच्या बाहेर होणारा करणवीर बोहरा पहिला स्पर्धक होता. करणवीरनंतर रोमिल चौधरी आणि मग दीपक ठाकर विजेत्या स्पर्धेतून बाहेर पडला.


बिग बॉस 12 हे सिझन एकूण 105 दिवस चाललं. 15 आठवड्यांनतर शोमधून विजयी स्पर्धक घोषित करण्यात आला. या ग्रँड फिनालेमध्ये क्रिकेटर श्रीसंतला मोठी टक्कर मिळाली दीपिका कक्कडकडून. 


15 आठवड्यांच्या या खेळानंतर दीपिका कक्कड विजेती ठरली असून श्रीसंत उप विजेता ठरला आहे.