मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बिग बॉस 12 शो चर्चेत आहे. विचित्र जोड्यांनी सुरू झालेल्या या सिझनमध्ये खूप काही गोष्टी पाहायला मिळत आहे. मात्र या शोमध्ये सर्वात जास्त चर्चेत आली ती म्हणजे भजन सम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारू. जसलीन अनूप यांच्यापेक्षा 37 वर्षांनी लहान आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत आहे. बिग बॉसच्या घरात जसलीनच्या आधीच्या बॉयफ्रेंडचा मोठा खुलासा झाला आहे. या खुलासामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसच्या घरात कॅप्टेन्सी टास्क झाला. या टास्कमध्ये सगळे स्पर्धक आपल्या जीवनातील अनेक सिक्रेट शेअर करतात. या दरम्यान जसलीनने सांगितलं की, अनूप जलोटाच्या अगोदर ती बॉलिवूड सिंगर सुखविंदर सिंहला डेट करत होती. हे सगळ कळल्यानंतर घरातील सगळे स्पर्दख आश्चर्यचकित झाले आहेत. सुखविंदर यांच्यापेक्षा जसलीन 19 वर्षांनी लहान आहे. महत्वाचं म्हणजे या अगोदर जसलीनने जलोटा यांना सुखविंदर यांच्याबद्दल काही सांगितलं नाही. 


जसलीनने हे सिक्रेट शेअर केल्यावर अनूप जलोटा हे मात्र हैराण नाही झाले. त्यांनी सांगितलं की, जसलीन आणि सुखविंदर रिलेशनशिपबद्दल त्यांना अगोदरच माहिती होतं. अनूपने सांगितलं की, जसलीन यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने हे गुपित अगोदर शेअर केलं आहे. 


जसलीन मथारूप्रमाणेच अनेक सदस्यांनी आपल्या आयुष्यातील खूप अनेक गोष्टी शेअर केल्या. सुखविंदर सिंहची  'कर हर मैदान फतह', 'लाय वी न गयी' आणि 'छइया छइया' सारखे सुपरहिच गाणी दिली आहे. सुखरविंद सिंह बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो.