मुंबई : सध्या सर्वत्र बिग बॉस 15  (Bigg Boss 15)ची  चर्चा आहे. सर्वचं स्पर्धक घरात उत्तम खेळी करत आहेत. ऐकीकडे  उमर रियाझ आणि तेजस्वी प्रकाश यांच्याच जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे, तर दुसरीकडे घरातील ड्रामा प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. आता येत्या एपिसोडमध्ये प्रतीक बाथरूमचं कुलूप तोडताना दिसणार आहे. त्याचं वेळी विधी बाथरूममध्ये अंघोळ करत असते. त्यामुळे आता पुढे काय होईल हे पाहाणं तितकचं मजेदार ठरणार आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या बिग बॉस हाऊसमध्ये घरातले सदस्य आणि जंगलवासींमध्ये जबरदस्त दंगल पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांचे स्पर्धक एकमेकांच्या जीवाला हानी पोहचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांच्या दरम्यान, प्रतीक सहजपालने विधीला घाबरवण्यासाठी बाथरूमचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न करू लागला.  जेव्हा ती आंघोळ करत असल्याचं त्याला कळालं तेव्हा तो कुलूपसोबत खेळू लागला.


सध्या 'बिग बॉस 15' च्या घरात तुफान राडे पाहायला मिळत आहे. दोन्ही गट वियज मिळविण्यासाठी कट रचत आहेत. शिवाय कोणता स्पर्धक कशी खेळतोय याकडे सर्व प्रेक्षंकांचं लक्ष लागलं आहे. तर  शोमध्ये करण कुंद्रा तुफान चर्चेत आहे.