उल्टा मास्क घातल्यामुळे सलमान ट्रोल, चाहत्यांनी अशी उडवली खिल्ली
मास्कची सवय नसलं की असंच होतं...
मुंबई : सलमान खान बॉलिवूडचा दबंग हिरो म्हणून लोकप्रिय आहे. त्याच्याशी पंगा घेणं सहसा सगळेच टाळतात. मात्र भाईजान स्वतः सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. सलमान खान 'टाइगर 3' सिनेमाच्या शुटिंगनंतर एअरपोर्टवर दिसला. यावेळी सलमानने घातलेल्या मास्कमुळे तो चांगलाच ट्रोल झाला आहे.
सलमानचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे. भाईजानने घातलेल्या मास्कमुळे चांगलाच ट्रोल झाला आहे. कधीही मास्क न लावणारा व्यक्ती जेव्हा मास्क लावतो... असं म्हणतं सलमानला ट्रोल करण्यात आलं आहे. सलमानने घातलेला उल्टा मास्क चाहत्यांना आणखी संधी देत आहे. दुसऱ्या युझरने म्हटलंय की, मास्क उल्टा आहे. सलमानजी मास्क तर सरळ घाला. रविवारी सलमान खान आपल्या टायगर 3 या सिनेमाचं शुटिंग संपवून मुंबईत आला. तेव्हाचा त्याचा मास्क सगळ्यांसमोर आला. सलमान खान तुर्की आणि रशियात टाइगर 3 सिनेमाचं शुटिंग करत होता.
सलमानने ब्लॅक टी-शर्ट, जीन्स आणि ब्लू शर्टसह मॅचिंग हॅट घातली होती. त्याने आपला लुक मॅचिंग फेस मास्कने पूर्ण केला, पण लोकांच्या लक्षात आले की सलमानने उलटा मास्क घातला आहे. यासाठी अभिनेत्याला खूप ट्रोल करण्यात आलं आहे. सलमान लवकरच 'बिग बॉस 15' होस्ट करताना दिसणार आहे. ऑक्टोबर महिन्यात हा शो सुरू होईल.
टायगर 3 चित्रपटाचे सुमारे 65 टक्के शुटिंग पूर्ण झाले आहे. आता मुंबईतील वायआरएफ स्टुडिओमध्ये एक सेट तयार केला जात आहे. चित्रपटात सलमान व्यतिरिक्त इम्रान एका पाकिस्तानीची भूमिका साकारताना दिसणार आहे. जो चित्रपटात सलमान खानच्या सुपर स्पाय पात्राच्या विरोधात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत आणि निर्मात्यांनी अद्याप प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.